सांगली । रयत क्रांती संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष तथा आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली रयत क्रांती संघटनेच्या वतीने दि. 31 मे 2025 ते 1 जून 2025 रोजी एस. के. इंटरनॅशनल सैनिक स्कूल, इस्लामपूर (ता. वाळवा) जि. सांगली येथे दोन दिवसीय कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आमदार सदाभाऊ खोत यांची संकल्पना
संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांच्या संकल्पनेतून हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. कार्यकर्ता हा केवळ संघटनेचा भाग नसून तो चळवळीचा आधारस्तंभ असतो. कार्यकर्त्याची जडणघडण ही शिबिरातूनच घडत असते. शेतकरी चळवळीला एक समृद्ध वैचारिक परंपरा आहे आणि आजचा कार्यकर्ता केवळ भावनेवर नाही तर विचारांवर आधारलेला असावा, यावर आमचा ठाम विश्वास आहे. अर्थवाद मांडता येणारा, समाजाच्या समस्या समजून घेणारा आणि परिवर्तनाची दिशा स्पष्ट करणारा कार्यकर्ता आपल्याला घडवायचा आहे.
शिबिराची प्रमुख वैशिष्ट्ये :
-
प्रेरणादायी व्याख्याने : सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
-
प्रशिक्षण सत्र : संवाद कौशल्य, नेतृत्व विकास, सोशल मीडियाचा प्रभाव इत्यादी विषयांवर व्याख्यान
-
प्रात्यक्षिके आणि चर्चा : सकाळी व्यायाम, सायंकाळी विचारमंथन सत्र
याच उद्देशाने रयत क्रांती संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष तथा आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली रयत क्रांती संघटनेच्या वतीने दि. 31 मे 2025 ते 1 जून 2025 रोजी एस. के. इंटरनॅशनल सैनिक स्कूल, इस्लामपूर ता. वाळवा जि. सांगली येथे दोन दिवसीय कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराला रयत क्रांती संघटनेचे राज्यातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. संघटनेला पूरक असे विविध विषय घेऊन अनेक मान्यवर या दोन दिवसीय शिबिराला संबोधित करणार आहेत.
या शिबिरात राज्यभरातून कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्यांना वैचारिक समृद्धीबरोबरच सामाजिक भान व नेतृत्व गुणांची जाण मिळणार आहे, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. शिबिराचे संयोजन रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर खोत यांच्या नेतृत्वाखाली केले जात आहे.