सांगली । काही लोकांना खूप गडबड झाली बसेस चे पूजन करायची,काही लोकांना वाटते पत्र दिल्याने बसेस आल्या. त्यांचे महाविकास आघाडी सरकार होते तेव्हा बसेस का आल्या नाहीत, ३५ वर्षे मंत्री होता तेव्हा पत्र द्यायला सुचले नाही. महायुती सरकारने राज्यातील सर्वच बस स्थानकांना बसेस दिल्या आहेत. त्यामुळे याचे श्रेय फक्त महायुती सरकारचे आहे.पहिल्या टप्प्यात ५ बसेस आलेत अजून पाच बसेस येणार आहेत. बी ओ टी तत्वावर या बस स्थानकांचे नूतनीकरणाचे काम करण्याचा प्रस्ताव देखील लवकरच सादर केला जाणार असल्याचे मत माजी मंत्री,आ. सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.
इस्लामपुर बसस्थानकासाठी महायुती सरकार ने दिलेल्या नविन बससेच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
यावेळी आ. सत्यजित देशमुख म्हणाले, शिराळा व इस्लामपूर बसस्थानकाकडे नवीन बसेस ची मागणी लक्षात घेता पहिल्या टप्प्यात पाच बसेस आल्या आहेत.या दोन्ही बस स्थानकासाठी नवीन बसेस जास्तीत जास्त आणण्याचा आमचा प्रयत्न राहील.
यावेळी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे नेते निशिकांत भोसले- पाटील म्हणाले, महायुती सरकारने राज्यातील सर्वच बसस्थानकाचा विकास करण्याचे धोरण राबविले आहे.नवीन बसेसची मागणी भरपूर आहे. आज पाच बसेसचे लोकार्पण झाले.ईश्वरपूर बस स्थानकसाठी अजून नवीन बसेसची आवश्यकता आहे. नवीन बसेस मिळण्याच्या दृष्टीने आम्ही सर्वजण प्रयत्नशील असुन आवश्यक असणार्या उर्वरीत बसेस लवकरच प्रवाशांच्या सेवेत येतील.
इस्लामपूर बसस्थानकास महायुतीने सरकारने नवीन ५ बसेस दिल्या.आज नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा झाला.
माजी राज्यमंत्री व आमदार मा.सदाभाऊ खोत, आमदार सत्यजित देशमुख, राष्ट्रवादीचे नेते निशिकांत भोसले- पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक राहुल महाडीक, भाजपाचे जेष्ठ नेते सी.बी.पाटील, हुतात्मा उद्योग समूहाचे नेते गौरव नायकवडी,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष केदार पाटील, माजी नगरसेवक विक्रम पाटील, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष निवास पाटील, भाजपचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील मोरे, रयत क्रांती संघटना प्रदेशाध्यक्ष सागर खोत, ईश्वरपूर भाजपचे माजी अध्यक्ष अशोक खोत, वाळवा तालुका रयत क्रांती संघटना अध्यक्ष अमोल पाटील, रयत क्रांती संघटना अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष मोहसीन पटवेकर, बसस्थानक व्यवस्थापक दिलीप ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.