Last Updated on 19 Apr 2025 8:34 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । वैद्यकीय ज्ञानमंदीरे व उपचार केंद्रे ही देशाच्या विकासाला पुढे घेऊन जाणारी आहेत, कोरोनाच्या संकट काळात आपल्या भारत देशाने आपल्या देशावरील संकटावर मात केली याचबरोबर इतर देशातही उपचाराच्या लसीचा पुरवठा करुन महामारीच्या संकटात माणुसकीचे दर्शन घडविले. आपल्या सांगली जिल्ह्यात ही परिस्थिती अत्यंत बिकट होती. मात्र आपल्या प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरने या संकट काळात मोठे योगदान दिले असल्याचे मत आ.सत्यजित देशमुख यांनी व्यक्त केले.
प्रकाश मेडीकल इन्स्स्टिटयुट ऑफ सायन्स ॲण्ड रिसर्च सेंटर उरूण-इस्लामपुर २०१९ च्या बॅचच्या विद्यार्थी विद्यार्थीनीचा पदवीदान कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रकाश शिक्षण मंडळाचे संस्थापक मार्गदर्शक निशिकांत भोसले-पाटील होते. यावेळी प्रकाश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय जाधव,संचालिका सौ. सुनिता निशिकांत भोसले-पाटील, मेडीकल डायरेक्टर डाॅ.विजय पाटील, हॉस्पिटल अधिक्षक डॉ भूपाल गिरीगोसावी,अधिष्ठाता डॉ ज्योत्सना वडेर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ.सत्यजित देशमुख म्हणाले, निशिकांत भोसले-पाटील यांनी स्वकर्तृत्वावर शिक्षण व आरोग्य संस्था उभा करुन आदर्श पणे चालविल्या आहेत,त्यांची वाटचाल ही सोपी नव्हती अनेक अडथळ्यावर मात करत त्यांनी संस्थात्मक वैभव उभे केले आहे,जिल्ह्याच्या विकासात या संस्थेचा मोलाचा वाटा आहे,या संस्थेने फक्त डाॅक्टर घडविले नाहीत तर देशाच्या विकासाला चालना देणारी पिढी घडविली आहे,भविष्यात लोकप्रतिनिधीत्व करताना या संस्थेला आवश्यक ती मदत करण्यासाठी मी कटिबध्द असेन,डाॅक्टर पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन भविष्यात डाॅ.बाबा आमटे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन सेवेच्या माध्यमातुन काम करावे असा सल्ला दिला.

यावेळी निशिकांत भोसले-पाटील म्हणाले,आजपर्यत या संस्थेतुन हाजारो विद्यार्थी फक्त डाॅक्टर होऊन बाहेर पडले नाहीत तर चांगला व उत्तम नागरीक घडविण्याचे काम या संस्थेने केले. या संस्थेत विद्यार्थी,अध्यापक व व्यवस्थापन समिती एक कुटुंब म्हणुन पुढे जात आहे,कोरोना काळात देशावरील संकट हे माझ्या कुटुंबावरील संकट म्हणुन आम्ही काम केले. यामध्ये विद्यार्थ्याचाही मोलाचा वाटा आहे,आज पाच वर्षापुर्वी आलेली मुले पदवी घेऊन पुढे जात आहेत. आमचे सोबती आम्हाला सोडुन चाललेत अशी भावना निर्माण झाली आहे. जगात कुठे ही जाऊन सेवा करा मात्र आपल्यातील अंतर कमी होऊ देऊ नका. भविष्यात तुमच्या चांगल्या कामासाठी ही संस्था तुमच्याबरोबर सदैव सोबत असेल असे मत शेवटी निशिकांत भोसले-पाटील यांनी व्यक्त केले.यावेळी मधुरा झिरपे व प्रतीक चौरे या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली
सुत्रसंचलन जान्हवी सारडा, करण गुप्ता यांनी केले. स्वागत व प्रास्थाविक तीस्ता वर यांनी केले. आभार नुसरत शेख यांनी मानले. २०१९ च्या बॅच मधील अनुक्रमे प्रथम रिद्धी पाटील,व्दितीय ईशा पावसकर व तृत्तीय आलेल्या श्रेया कदम या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते डाॅक्टर पदवी देऊन सन्मानीत करण्यात आले.
यावेळी धैर्यशील मोरे, चंद्रकांत पाटील, डॉ. जयदीप पाटील, डॉ. जान्हवी पोळ, डॉ. बळवंत चौरे, हिम्मत जाफळे, संदीप यादव, संतोष पाटील आदींसह अन्य मान्यवर, पालक, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.














































































