Last Updated on 10 Apr 2025 2:38 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांनी केवळ आराम न करता, त्यांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास व्हावा, यासाठी नेर्ले (ता. वाळवा) येथील मम्मा प्री स्कूल यांच्या वतीने १० दिवसीय आर्मी समर कॅम्प २०२५ आयोजित करण्यात येत आहे. २१ एप्रिल ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत भरगच्च उपक्रमांसह हे शिबिर पार पडणार आहे.
या शिबिरात ५ ते २५ वयोगटातील मुलांना विविध कौशल्यवृद्धीचे आणि आरोग्यवर्धक उपक्रम शिकवले जाणार आहेत. शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे केवळ खेळ नव्हे, तर योगा, ध्यान, शिस्तशीर सूर्यनमस्कार, तीरंदाजी, रायफल शूटिंग, वकृत्व, लाठीकाठी, ओंकार, प्राणायाम, स्विमिंग अशा शारीरिक आणि मानसिक समतोल साधणाऱ्या उपक्रमांचा समावेश आहे.
प्रवेश फी फक्त १ हजार रुपये असून, प्रवेशासाठी इच्छुकांनी लवकरात लवकर संपर्क साधावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.










































































