सांगली । इस्लामपूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील मयूर मडसनाळ या तायक्वांदो राष्ट्रीय खेळाडूस शिवाजी विद्यापीठाची 30 हजार रुपयाची क्रीडा शिष्यवृत्ती मिळाली.
इतर विद्यापीठाप्रमाणे आपल्याही शिवाजी विद्यापीठाची क्रीडा स्पर्धेतील गुणवत्ता वाढविण्यासाठी 2022-2023 या शैक्षणिक वर्षा मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिल मध्ये खेळाडूंना मोठी शिष्यवृत्ती देण्याबाबतचा हा प्रस्ताव त्या वेळचे मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य ॲड. धैर्यशील पाटील यांनी मांडून त्याला मान्यता घेतली. त्यानुसार इस्लामपूरच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांने राष्ट्रीय खेळाडू विद्यार्थी प्रोत्साहन पर क्रीडा शिष्यवृत्ती योजनेचा प्रस्ताव विद्यापीठाकडे सादर केला होता.
या खेळाडूला पाचवीपासून तायक्वांदो या खेळाची आवड होती. या ही वर्षी या खेळाडूंने शिवाजी विद्यापीठाच्यावतीने वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेमध्ये मध्ये क्वालिफाय होऊन अखिल भारतीय अंतर विद्यापीठ तायक्वांदो स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या संघामध्ये सहभाग नोंदविला. मयूर हा या महाविद्यालयामध्ये बीए भाग दोन मध्ये शिकत आहे
महाविद्यालयामध्ये मयूर याचा सत्कार संस्थेचे सहसचिव ॲड. धैर्यशील पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्याला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. हेमंत नारायणकर व राष्ट्रीय कोच सुनील खिलारे,प्रा. नितीन शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. या खेळाडूचे अभिनंदन संस्थेचे मानद सचिव अँड. बी. एस. पाटील व सहसचिव ॲड.धैर्यशील पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एम. जाधव, महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. अशोक शिंदे व सर्व स्टाफनी अभिनंदन केले.