मुंबई : मुख्यमंत्री लडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यातील जवळपास ५ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी X वरील पोस्टमध्ये दिली आहे.
या पोस्ट मध्ये म्हटले आहे की,
दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून वगळण्यात येत आहे.
अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे :
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला – २,३०,०००
वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या महिला – १,१०,०००
कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या,स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला – १,६०,०००
एकुण अपात्र महिला – ५,००,०००
सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द आहे !
हेही वाचा – शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश