Last Updated on 12 Jan 2025 6:23 PM by Sanjay Patil/Adhorekhit
प्रयागराज : येथे १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी जय्यत तयारी सुरु असून, विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांसाठी प्रयागराज नगरी सज्ज झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज या तयारीचा आढावा घेणार आहेत.
दरम्यान, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी काल प्रयागराज इथं कलाग्राम केंद्राचा आढावा घेतला. या कुंभमेळ्याला ४५ कोटींहून अधिक भाविक भेट देण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. तर केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल प्रयागराज इथल्या नवीन टर्मिनल इमारतीची पाहाणी त्यांनी केली. येत्या १५ तारखेपासून हे विमानतळ कार्यान्वित होईल, असं त्यांनी सांगितलं.
महाकुंभ मेळ्याचं महत्व
महाकुंभ हा भारतीय संस्कृती आणि कलेचा महत्वपूर्ण संगम आहे. बारा वर्षांच्या कालावधीनंतर प्रयागराज इथं होत असलेल्या या सोहळ्यात यंदा कोट्यवधी भाविक एकत्र येणार आहेत. महाकुंभांचं महत्व जाणून घेऊयात या वृत्तांतातून. महाकुंभ मेळा हा केवळ एक धार्मिक सोहळा नाही तर तो एक सामाजिक संगम आहे जिथे विविध जाती, धर्म आणि प्रदेशांतील लाखो लोक एकत्र येतात. हा भारतीय समाजाच्या एकतेचे आणि विविधतेचे प्रतीक आहे.
कुंभ हा जगातील असा उत्सव आहे, जिथे कोणत्याही आमंत्रणाची अपेक्षा न ठेवता, कोट्यवधी यात्रेकरू हा पवित्र सोहळा साजरा करण्यासाठी एकत्र येतात. सनातन धर्मात अनादी काळापासून महाकुंभाची परंपरा सुरु आहे. लोक इथं परंपरेनुसार एकत्र येतात आणि तिथल्या नदीत स्नान करून पुण्यकर्मात सहभागी होतात. पारंपारिक स्नान विधीव्यतिरिक्त, यज्ञविधी, वैदिक मंत्रांचा जप, प्रवचने, नृत्य, भक्तीगीते, आध्यात्मिक विषयांवर आधारित कार्यक्रम, प्रार्थना, धार्मिक सभा इथं अव्याहत सुरु असतात. यातून मेळ्याला सामाजिक अधिष्ठान प्राप्त होतं मान्यवर संत आणि साधू विविध सिद्धांतांवर चर्चा करतात. या मंथनातून ज्ञान नवनीत समोर येतं. कुंभमेळा हे एक अद्वितीय पर्व आहे जिथे विविध संस्कृती, भाषा आणि परंपरांचे धागे सहजपणे एकमेकात मिसळतात. हे विविधतेतील एकतेच्या सिद्धांताचं साक्षात प्रमाण मानलं जातं. असं मानलं जातं की आदि शंकराचार्यांनी कुंभमेळा हा एक भव्य उत्सव म्हणून साजरा करण्यासाठी मुहुर्तमेढ रोवली.
त्यांनी धर्म, संस्कृती आणि एकतेला प्रोत्साहन देण्यासाठी हा उत्सव सुरू केला. आदि शंकराचार्यांनी जे केले त्याचे ऋण सनातन संस्कृती कधीही फेडू शकत नाही. त्यांना मनापासून कोटी कोटी नमन. आद्य शंकराचार्यांनी दिव्य भावना हेतुनं या मेळ्यांचं आयोजन सुरु केलं, त्या मागे आद्य शंकराचार्यांचा मोठा विचार होता. त्यांनी भारतीय लोकांना संघटित करण्यासाठी, एक संस्कृती, एक सांस्कृतिक जीवन, एक राष्ट्र यांचा पुरस्कार केला. यातूनच एक सक्षम, भक्कम राष्ट्र ताकदीनं उभं राहावं या दृष्टीनं संपूर्ण भारताचं संघटनात्मक सामर्थ्य टिकवून ठेवण्यासाठी या मेळ्याचं आयोजन सुरु झालं.
ही परंपरा अनेक वर्षांपासून अविरत सुरू आहे. एक प्रकारे ही भारताची एकताच दर्शवते. वेगवेगळ्या प्रदेशातील लोक इथं एकाच ठिकाणी राहतात, हे सारं चित्र पाहिलं की महाकुंभ मेळा हे सांस्कृतिक देवाणघेवाणीचं माध्यम असल्याचं स्पष्ट होतं. यात्रेकरूंना केवळ धार्मिक प्रथांमध्ये सहभागी होण्याचीच नव्हे तर राष्ट्राच्या गाभ्याची जाणीव करुन देणाऱ्या चैतन्यशील संस्कृतीचे साक्षीदार होण्याची आणि त्यात सहभागी होण्याचीही संधी प्रदान होते.
महाकुंभ मेळा कडेकोट सुरक्षा व्यवस्था
प्रयागराज इथं होऊ घातलेल्या महाकुंभ मेळा 2025 ची तयारी आता पूर्णत्वाला पोहचली आहे. ४५ कोटी भाविकांच्या सुरक्षेची विशेष सज्जता करण्यात आली आहे. तपासणी चौक्या, ड्रोनद्वारे टेहळणी आणि १० हजारांपेक्षा अधिक पोलीस, पीएसी, एनडीआरएफ तसंच केंद्रीय सशस्त्र पुलिसदलाचे जवान तैनात असणार आहेत. जगातला सर्वात मोठा अध्यात्मिक, संस्कृतीवाहक तसंच धार्मिक सोहळा म्हणून महाकुंभ मेळ्याला अग्रस्थान आहे. प्रयागराज इथं यंदा होत असलेल्या या महाकुंभात ४५ कोटींपेक्षा अदिक भाविक सहभागी होण्याचा अंदाज आहे. त्यांच्या सुरक्षेला नियोजनात प्राथमिकता दिली जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं महाकुंभ नगरीतल्या सर्व प्रमुख मंदीरं अणि पर्यटन स्थळी सुरक्षा व्यवस्था कडेकोट केली आहे, याशिवाय प्रयागराज आणि आसपासच्या परिसरात गुप्तचर यंत्रणा सक्रीय करण्यात आली आहे. ड्रोनच्या माध्यमातून टेहळणी केली जात असून, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवलं जात आहे. असामाजिक घटकांच्या कारवायांना रोखण्यासाठी गुप्तचर पथकं सक्रीय झाली आहेत. प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जात असल्याचं सुरक्षा विभागानं सांगितलं आहे. उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही वैयक्तिक लक्ष घालत महाकुंभाच्या सुरक्षेसाठी सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत, याअंतर्गत प्रयागराजला जोडणाऱ्या सात मार्गांवर तसंच आसपासच्या ८ मार्गांवर 102 सुरक्षा चौक्या उभारल्या आहेत. 1026 पुलिसकर्मचारी, 113 होमगार्ड आणि पीआरडीचे जवान तैनात केले आहेत. याशिवाय, 3 विभागीय पीएसी, 5 वज्र वाहन, 10 ड्रोन आणि 4 एंटी-सबोटाज पथकंही सक्रीय केली आहेत. याशिवाय “डिजिटल महाकुंभ” बनवण्या करता आधुनिक तंत्रज्ञानाचाही उफयोग केला जात आहे, एआई-संचालित कॅमरे, ड्रोन, और एंटी-ड्रोन तंत्रत्ज्ञानाच्या सहाय्यानं लक्ष ठेवलं जात आहे. प्रयागराज पुलिसांनी सुरक्षा उपाययोजनांअंतर्गत 57 स्थायी पुलिस स्टेशन, 13 अस्थायी पुलिस स्टेशन और 23 तपासणी चौक्या स्थापन केल्या आहेत. यासोबतच 10 हजारापेक्षा अधिक पुलिसकरमचारी, पीएसी, एनडीआरएफ आणि केंद्रीय सशस्त्र पुलिसदलाचे कर्मचारी तैनात आहेत, 700 पेक्षा अधिक बोटींवरही सुरक्षा दलं सज्ज असतील.
Courtesy: Prasar Bharati












































































