Last Updated on 10 Jan 2025 10:06 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । कासेगावचे सुपुत्र डॉ.राजवर्धन किरण पाटील यांची भारत सरकारच्या कृषी संशोधन विभागात कृषी संशोधक अधिकारी-वर्ग १ या पदावर निवड झाली आहे. माजी मंत्री आ.जयंत पाटील,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी सभापती रविंद्र बर्डे,माजी सरपंच किरण पाटील,माजी उपसरपंच दाजी गावडे प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ.राजवर्धन हे देशातील शेती व शेतकरी यांच्यासाठी संशोधन करणाऱ्या दिल्ली येथील इंडियन ऍग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये संशोधक म्हणून रुजू होणार आहेत. त्यांच्या निवडीने कासेगाव व परिसरात आनंद साजरा केला जात असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
डॉ.राजवर्धन यांनी प्राथमिक शिक्षण व्ही. एस.नेर्लेकर विद्यालय इस्लामपूर,माध्यमिक शिक्षण संजीवनी विद्यानिकेतन पन्हाळा,उच्च माध्यमिक शिक्षण स्वामी विवेकानंद महा विद्यालय सातारा येथून घेतले आहे. त्यांनी बी.टेक (ऍग्री) ही पदवी कृषी विद्यापीठ राहुरी,तर एम.टेक (ऍग्री) हे पदव्युत्तर शिक्षण इंडियन ऍग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट दिल्ली येथून घेतले आहे. त्यांनी अन्न प्रक्रिया व पीक काढणी पश्चात प्रक्रिया या विषयावर दिल्ली येथून पीएचडी केली आहे.
शिराळ्याचे आ.सत्यजित देशमुख, राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील,पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक डी.डी.शिंदे यांच्यासह कासेगाव व परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ.राजवर्धन यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांना वडील,माजी सरपंच किरण पाटील,आई सौ.कल्पना पाटील,आत्या माधुरी भगत (बुधगाव) यांचे विशेष प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले आहे.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 09 May 2026 8:34 PM by Sanjay Patil/Adhorekhit चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांचा महत्वपूर्ण निर्णय कामगार वर्गात समाधानाचे वातावरण कराड । रेठरे बुद्रुक येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्य... Read more
















































































