मुंबई । बीकेसीतील अभ्यागतांच्या संख्येत होणारी वाढ विचारात घेता, अरुंद रस्त्यांसाठी अत्यंत योग्य असलेली पॉड टॅक्सी प्रणाली सुरु करण्याचा निर्णय ‘एमएमआरडीए’ने घेतला आहे. या परिसरासाठी १५ ते ३० सेकंदांच्या अंतराने चालवता येणारी स्वयंचलित पॉड टॅक्सी प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
पॉड टॅक्सी प्रकल्पासाठी ‘एमएमआरडीए’ने मे.साई ग्रीन मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड यांना ऑपरेशन व देखभाल सवलतकार म्हणून नियुक्ती करण्यास मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे बीकेसीमध्ये दररोज प्रवास करणाऱ्या ४ ते ६ लाख लोकांची गरज भागवली जाईल.
मुंबईतील व्यस्त व्यावसायिक क्षेत्रात शहरी वाहतूक सुधारण्यासाठी घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. पॉड टॅक्सी लास्ट माइल कनेक्टिव्हिटी सुधारण्याबरोबरच वाहतूक कोंडी कमी करून प्रवाशांसाठी आधुनिक, कार्यक्षम प्रवास साधन उपलब्ध करून देईल.
डॉ.संजय मुखर्जी
आयुक्त, एमएमआरडीए महानगर