Last Updated on 26 Jul 2024 1:38 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । इस्लामपूर येथील शिंदेज लॅबोरेटरी अँड मायक्रोबायोलॉजी सेंटरमधील तीन विद्यार्थ्यांना यावर्षी राज्य शासनाच्या आरोग्य विभागात प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली. साईप्रसाद पाटील, नीशा रहाटे (इस्लामपूर) व अक्षय अवताडे (विटा) यांचा सन्मान करण्यात आला.
हा सत्कार देवांश फाउंडेशनच्या संस्थापक सचिव स्वाती शिंदे तसेच उपाध्यक्ष दयानंद जाधव व संचालक कविराज मस्के यांच्या हस्ते संस्थापक जयकर शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला.याप्रसंगी शिंदेज लॅबोरेटरी अँड मायक्रोबायोलॉजी सेंटरचा सर्व स्टाफ उपस्थित होता.
यावेळी संस्थापक जयकर शिंदे म्हणाले,राज्य शासनाच्या आरोग्य विभागात प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली. खरंतर ही आमच्यासाठी खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे.















































































