सांगली । इस्लामपूर येथील सौ. भारती अनिल पावणे (वय 51) यांचे आज,मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले.येथील प्रसिद्ध कांदा,बटाट्याचे व्यापारी व इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल पावणे यांच्या त्या पत्नी होत.त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.रक्षा विसर्जन गुरुवार दि. 25 रोजी कापूसखेड रोड स्मशानभूमी इस्लामपूर येथे सकाळी 9 वाजता होणार आहे.