Last Updated on 16 Jul 2024 7:52 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । साखराळे (ता.वाळवा) येथील माजी पंचायत समिती सदस्य,महराष्ट्र राज्य धनगर महासंघाचे जिल्हा सदस्य शिवाजी धोंडीराम डांगे (वय ४९ वर्षे) यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,आई,अविवाहित मुलगा,मुलगी असा परिवार आहे. रक्षा विसर्जन व कार्य विधी गुरुवार दि.१८ जुलै २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता साखराळे येथे होणार आहे. शिवाजी डांगे हे गेल्या कित्येक वर्षा पासून साखराळे गावाच्या सार्वजनिक जीवनात,तसेच धनगर महासंघाच्या माध्यमा तून जिल्ह्यात कार्यरत होते. त्यांच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.












































































