सांगली । साखराळे (ता.वाळवा) येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक चिंतामणी धोंडी सुर्यवंशी (वय ९४ वर्षे) यांचे वार्धक्याने निधन झाले.त्यांनी रिळे,जत,ताकारी,नवेखेड,हुबालवाडी,रेठरे हरणाक्ष आदी गावात आदर्श शिक्षक म्हणून ३३ वर्षे सेवा केली आहे.
त्यांच्या पश्चात विवाहित दोन मुलगे,दोन मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे.जलदान विधी गुरुवार दि.१४ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता साखराळे येथे होणार आहे.वाळवा पंचायत समितीचे माजी सभापती शैलेंद्र सुर्यवंशी व संजय सुर्यवंशी यांचे ते वडील होत.