Last Updated on 08 Sep 2023 9:08 AM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । देशात पुन्हा एकदा मान्सूनचं मान्सूनचं कम बॅक झालं असून पावसाला सुरुवात झाली आहे.येत्या तीन दिवसांत पश्चिम मध्य प्रदेश,महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.शुक्रवारी उत्तर प्रदेश आणि पूर्व राजस्थानमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.शुक्रवारी १९ राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.पुढील दोन दिवस म्हणजे 9 आणि 10 सप्टेंबर रोजी 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबईत पावसाचा यलो अलर्ट
भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रातील मुंबई,ठाणे,पालघर,रायगड,रत्नागिरी,धुळे,जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.या जिल्ह्यांमध्ये ८ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.गुरुवारी झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना उन्हापासून थोडासा दिलासा मिळाला.मात्र,पावसामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्याच्या अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.दरम्यान, राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाची प्रतिक्षा कायम आहे.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.राज्यातील काही भागांमध्ये पुढील 2-3 दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.














































































