इस्लामपूर : वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीच्या विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्रा विजयकुमार शंकरराव शिंदे हे डिसेंबर २०२० मध्ये घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत शिक्षणशास्त्र विषयातून उत्तीर्ण झाले.
त्याबद्दल संस्थेचे मानद सचिव ॲड. बी. एस. पाटील (अण्णा), सहसचिव तथा शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन समितीचे सदस्य ॲड. धैर्यशील पाटील (बाबा),प्राचार्य संजय पाटील-ढोबळे, विभागप्रमुख प्रा. शशिकांत पाटील तसेच सर्व प्राध्यापक वृंद यांनी अभिनंदन केले.प्रा. शिंदे हे यापूर्वी मराठी विषयातून नेट – सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.









































































