Last Updated on 03 Jun 2023 8:24 PM by Sanjay Patil/Adhorekhit
बालासोर । ओडिशाच्या बालासोरमध्ये झालेल्या कोरोमंडल रेल्वे अपघातात मृतांच्या संख्येत वाढ झाली असून ही संख्या 288 वर पोहोचली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी अपघात स्थळावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.बचावकार्य युद्धपातळीवर सुरु असून एनडीआरएफ, रेल्वेच्या पथकाकडून आतापर्यंत अनेक लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आलेले आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ओडिशात बालासोर इथल्या रेल्वे अपघातस्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
शुक्रवारी संध्याकाळी बालासोरमधील बहनगा स्थानाकाजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघाताची तीव्रता इतकी गंभीर होती की, करोमंडल एक्सप्रेस रुळावरुन खाली उतरली. या अपघातात सुरुवातील मृतांची संख्या 50च्या आसपास होती मात्र त्यानंतर या रेल्वे अपघातातील मृतांचा आलेख वाढतच गेला. आतापर्यंत या अपघातात 288 जणांचा मृत्यू झाला असून 900 जण गंभीर जखमी झाली आहेत.

करोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी एकाच वेळी रुळावर आल्याने हा अपघात झाला.अनेक प्रवासी या अपघातात अडकले असल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यामुळे संपूर्ण परिसरात गर्दी आणि गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले.या अपघातात रेल्वेची धडक एवढी भीषण होती. की काही डबे हवेत उडाले.एनडीआरएफ, रेल्वे यांच्या पथकाकडून अनेक लोकांना सुखरुप बाहेर देखील काढण्यात आले.परंतु मृतांचा आकडा जास्त असल्याने त्यांची ओळख पटवून देण्याचे आव्हान आता प्रशासनासमोर आहे.कोरोमंडल एक्सप्रेसमध्ये सुमारे 1257 आरक्षित प्रवासी आणि यशवंतपूर एक्सप्रेसमध्ये 1039 आरक्षित प्रवासी होते.
प्रधानमंत्र्यांनी ओडिशातील अपघातस्थळाला भेट देऊन केली परिस्थितीची पाहणी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ओडिशात बालासोर इथल्या रेल्वे अपघातस्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.त्यांनी स्थानिक अधिकारी,आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली.त्यांनी त्यानंतर कॅबिनेट सचिव आणि आरोग्यमंत्र्याशी संवाद साधला.त्यानंतर त्यांनी फकिर मोहन वैद्यकीय रूग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.
प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या वारसांना दोन लाख रुपयांची मदत प्रधानमंत्र्यांनी जाहीर केली आहे तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रूपयांची मदत दिली जाणार आहे.तत्पूर्वी अपघातानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली.या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,कॅबिनेट सचिव राजीव गौबा,प्रधानमंत्र्यांचे मुख्य सचिव अजय कुमार भल्ला, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे प्रमुख एस एन प्रधान आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.








































































