Last Updated on 15 Apr 2023 8:09 AM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे | राज्यात एकीकडे सूर्य आग ओकत आहे तर दुसरीकडे अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे.आताही राज्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.राज्यातील या बदलत्या हवामानाचा फटका सर्वसामान्यांसोबत शेतकऱ्यांना देखील बसत आहे.
सध्या देशात काही ठिकाणी उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे.तर देशातील काही राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा पुणे हवामान खात्याने दिला असून काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जाहीर केला आहे.
अशामध्ये राज्यातील शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुणे आयएमडीने पुन्हा राज्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होईल,अशी शक्यता व्यक्त केली आहे. तसेच राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट ऑरेंज दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर संकटांवर संकट आले आहे.
राज्यात पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट होणार आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी म्हटले आहे की, १४ एप्रिल रोजी नगर, पुणे बीड, उस्मानाबाद, सातारा आणि कोल्हापूरसाठी ऑरेंज अलर्ट आहे.
तसेच धुळे, नाशिक, जळगाव, नंदुरबार आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी येलो अलर्ट दिला आहे. तसेच १५ आणि १६ एप्रिल रोजी काही ठिकाणी येलो अलर्ट आहे. १७ एप्रिलपासून वातावरण पुन्हा चांगले होणार आहे.












































































