सातारा । सातारा जिल्ह्यात दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान, सिझनल इन्फ्लुएन्झा आजार आणि कोविडच्या पार्श्वभूमीवर शासकीय,निमशासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी,कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी मास्क सक्ती केली आहे.
सातारा जिल्ह्यात दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.तसेच जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४५ वर पोहोचली आहे.दरम्यान, सिझनल इन्फ्लुएन्झा आजार आणि कोविडच्या पार्श्वभूमीवर शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करण्याचे आवाहन साताराचे जिल्हाधिकाऱी रुचेश ज्यांनी यांनी केले आहे.