Last Updated on 20 Jul 2022 9:34 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पावागड टेकडीवर वसलेल्या 11 व्या शतकातील या मंदिराचा कळस सुमारे 500 वर्षांपूर्वी सुलतान महमूद बेगडा याने उध्वस्त केला होता.
मंदिराच्या पुनर्विकासाचा एक भाग म्हणून त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे.
हे मंदिर चंपानेर-पावागड पुरातत्व उद्यानात आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये देखील त्याचा समावेश आहे आणि दरवर्षी लाखो यात्रेकरू इथे भेट देतात. विश्वामित्र ऋषींनी पावागड येथे कालिका देवीची मूर्तीची स्थापना केली होती, असे मानले जाते.
या मंदिराचा जीर्णोद्धार दोन टप्प्यात करण्यात आला आहे. यातील पहिल्या टप्प्याचे उद्घाटन एप्रिल 2022 मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत पुनर्विकसित ज्या भागाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे, त्याचे भूमिपूजनही त्यांनीच 2017 मध्ये केले होते. त्यात मंदिराच्या पायाचा विस्तार आणि तीन स्तरांवर ‘परिसर’, पथदिवे, सीसीटीव्ही यंत्रणा सारख्या सुविधांचा समावेश आहे.
तर हा शिखर ध्वज या बाबतचेही प्रतिक आहे की, शतके उलटतात, युग बदलतात, मात्र आस्थेचे शिखर शाश्वत असतो.” पंतप्रधान म्हणाले, “आज भारताचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक गौरव पुनर्स्थापित झाला आहे. आज नवा भारत आपल्या आधुनिक आकांक्षांबरोबरच आपला प्राचीन वारसा आणि प्राचीन ओळख तितक्याच जोशाने आणि उत्साहाने जतन करत आहे. प्रत्येक भारतीयाला त्याचा अभिमान आहे. पूर्वी पावागडचा प्रवास अवघड होता, आयुष्यात एकदा तरी मातेचे दर्शन घ्यायला मिळावे, अशी लोकांची इच्छा असायची असे ते म्हणाले. आज येथे वाढणाऱ्या सुविधांमुळे अवघड दर्शन सुलभ केले आहे. आता लहान मुले, वृद्ध, दिव्यांग सहजपणे मातेच्या चरणी नतमस्तक होऊन भक्ती व प्रसादाचा लाभ घेऊ शकतात.












































































