घरातील लोकांना वेगळे चटपटीत,चमचमीत मांसाहार पदार्थ खाण्याचे हट्ट करीत असतात.कधी न खालेले पदार्थ तयार करण्यासाठी वेळ ही असतो.त्यामुळे आज आम्ही खास मांसाहास प्रेमींसाठी ग्रीन मसाल्याचे खास चिकन बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत.तर जाणून घेऊयात रेसिपी..
साहित्य
- चिकन – अर्धा किलो
- तेल – 4-5 टेबल स्पून
- बारीक चिरलेला कांदा – 2 मोठे कांदे
- आलं-लसून पेस्ट – 3-4 टीस्पून
- हळद – 1 टीस्पून
- मीठ – 2-3 टीस्पून
मसाल्यासाठी साहित्य
धणे – 2 टीस्पून, जिरे – 1 टीस्पून, काळी मिरी – 1 टीस्पून, तेजपान -1, दालचिनी – 1 तुकडा, हिरवी वेलची – 4-5, स्टार फुल (चक्री फुल )-1, तीळ – 2 टीस्पून, खसखस – 3 टीस्पून, सुके खोबरे किसलेले – 4-5 टीस्पून, लवंग – 4-5, हिरवी मिरची – 5-6, कोथिबीर – 1 जुडी
कृती
- चिकन नीट धुवून त्याला मीठ, हळद, आलं-लसून पेस्ट, लावून ठेवून घ्या. साधारणपणे 1 तास तरी असच ठेवा.
- मंद आचेवर मसाल्यासाठी दिलेले साहित्य भाजून घ्या. भाजून झाल्यावर सगळ्यात शेवटी हिरवी व कोथबीर टाका व आच घालवून थंड झाला कि पाणी टाकून वाटून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात कांदा लाल होईपर्यत परतून घ्या. आता त्यात चिकन टाकून छान परतून घ्या.
- थोड गरम पाणी टाकून मंद आचेवर चिकन 10-15 मिनिटे शिजवून घ्या. मग त्यात वाटलेला हिरवा मसाला टाका. आवश्यक असल्यास पाणी टाका व चिकन नीट शिजवून घ्या आणि गरमागरम भाकरीबरोबर सर्व्ह करा.