Last Updated on 18 Jun 2023 10:04 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । माऊली नामाचा जयघोष, देहभान विसरून नाचणारे वैष्णव, हरिनामाचा गजर आणि त्यांना टाळ-मृदंगाची साथ… अशा भक्तिरसात चिंब झालेल्या वातावरणात श्री जगतगुरु मच्छिंद्रनाथ महाराजांच्या पालखीचे रविवारी किल्लेमच्छिंद्रगड येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाले.
श्री जगतगुरु मच्छिंद्रनाथ महाराजांच्या गडावरील मुख्य मंदिरातून सकाळी सातच्या सुमारास हरिनामाच्या गजरात पालखीचे प्रस्थान झाले.ग्राम प्रदक्षिणेनंतर मुख्य रस्त्याने गड घेऱ्यात आल्यानंतर रिंगण झाले यावेळी हजारो भाविक उपस्थित होते.तद्नंतर पालखीचे पंढरपूर कडे प्रस्थान झाले.
उरुण- इस्लामपूर नगरपरीषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष,इस्लामपूर विधानसभा निवडणूक प्रमुख मा.निशिकांत भोसले -पाटील यांनी श्री मच्छिंद्रनाथ पालखीचे दर्शन घेतले.यावेळी सर्व वारकरी बंधू भगिनींना मंगलमय शुभेच्छा दिल्या.यावेळी वाळवा तालुका भाजपा अध्यक्ष धैर्यशील मोरे,वाळवा तालुका महीला आघाडी च्या अध्यक्षा सुरेखाताई जगताप,किल्लेमच्छिंद्रगडच्या लोकनियुक्त सरपंच सौ. वैशाली साळुंखे,शशिकांत साळुंखे,भाजपा तालुका सरचिटणीस दादासाहेब रसाळ,सुभाष जगताप,बाळासाहेब जाधव,सतिश मोरे,हारुन शिकलगार,दादासो कांबळे,विनोद मोरे,पोपट चव्हाण,तुकाराम जगताप,व्यकटराव जाधव,बबन कदम,कैलास शिर्के,भानुदास कारंडे,विलास कदम,रामदास सरोदे,मच्छिंद्र शिर्के,सचिन जाधव,पंकज तांबवे,अमोल डुबल, सुरेश शिंदे,शरद निकम आदिसह अन्य मान्यवर,वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













































































