Last Updated on 22 Oct 2024 10:42 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेची स्थापना करण्यात आली. यासंदर्भात आज बुलढाणा येथे राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन रविकांत तुपकर यांनी ही घोषणा केली.
ही संघटना शेतकरी- शेतमजुरांच्या हितासाठी लढणारी संघटना असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. विधानसभेच्या निवडणुकीत शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणाऱ्यांसोबत ही संघटना सहभागी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये आपला शेतकरी मतदार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये ज्या जागा निवडून येऊ शकतील त्याचा जागा लढवणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीकडे प्रस्ताव पाठवला आहे. पहिला प्रस्ताव महाविकास आघाडीला दिला आहे. त्यांच्याकडे काही सकारात्मक निर्णय झाला नाही तर दुसरा पर्याय वंचित बहुजन आघाडीचा आहे. मात्र सन्मानाने सोबत घेत असतील तर ठीक नाहीत तर कोणाला पाडायचं व कोणाला निवडून आणायचं यावर लक्ष केंद्रित करु. , असे सूचक संकेतही रविकांत तुपकर यांनी दिले आहेत. मविआ आणि वंचित बहुजन आघाडी असे दोनच पर्याय आपल्याकडे आहेत. त्यानंतर मात्र आपला निर्णय स्वतंत्र राहिलं असं त्यांनी म्हटलं आहे.












































































