Last Updated on 19 Feb 2022 1:37 PM by Sanjay Patil/Adhorekhit
श्रीमंतयोगी,ज्ञानवंत,कीर्तीवंत,सामर्थ्यवंत यशवंत,जाणता राजा शिवाजी महाराज यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन !
“आशीर्वाद,आई भवानी व माता जिजाऊंचा..
मुहूर्तमेढ रोवली स्वराज्याची…
एकच होते शिवाजी
भीती नव्हती जगाची..
चिंता नव्हती परिणामांची ..
पण साथ होती मर्द मावळ्यांनची”..
19 फेब्रुवारी 1630 रोजी या मंगलदिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊंनी तेजस्वी पुत्राला जन्म दिला ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी राजे शहाजीराजे भोसले.
निश्चयाचा महामेरू | बहुत जनांसी आधारु| अखंड स्थितीचा निर्धारु | श्रीमंत योगी | यशवंत, किर्तीवंत ,सामर्थ्यवंत ,वरदवंत | जयवंत जाणता राजा|
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, मराठी स्वराज्य पहिले छत्रपती ,युगपुरुष “छत्रपती शिवाजी महाराज” यांची आज शिवजयंती.
फेब्रुवारी महिना म्हटले की, शिवजन्मोत्सव, यादिवशी प्रत्येकाच्या मनात शिव उधाण येतं. शिवाजी महाराजांचा जन्म म्हणजे आपल्या महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी सुवर्ण पर्वणी म्हणून लाभले.तब्बल साडेतीनशे वर्ष उलटून गेले तरीही, शिवाजी महाराजांचे विचार प्रेरणा पूरक अखंड कार्य व मार्गदर्शन करत आहेत.शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू संपूर्ण शिव तरुणांना प्रेरणा देतात.गुलामगिरीच्या बेडीत सापडलेल्या जनतेसाठी मराठी स्वराज्य निर्माण करण्याचा निर्णय घेतला तो अगदी बालवयात.
स्वराज्य स्थापनेचे स्वप्न सत्यात उतरवायचे धाडस शिवरायांनी करून दाखवले. ध्येयपूर्ती करताना संकटं येणारचं पण, येणाऱ्या संकटांना सामर्थ्याने अडचणी कसे पूर्ण करावे हा प्रेरणादायी विचार प्रत्येक मराठी मावळ्यांमध्ये रोवला.छत्रपती शिवाजी महाराजांनी नेतृत्व कसे असावे, याचे ज्वलंत उदाहरण दाखवून दिले, स्वराज्यासाठी लढणाऱ्या प्रसंगी मदत करणारी निष्ठावान माणसं जोडली. महाराजांनी अफजल खानाची भेट , शाहिस्तेखानाचा प्रसंग,पन्हाळा लढा अशा अनेक मोहिमा फत्ते करून कठीण प्रसंगात आपले नेतृत्व सिद्ध केले. स्वराज्याच्या लढ्यासाठी प्रचंड आत्मविश्वास जनतेच जागा करणारे युगप्रवर्तक नेतृत्व आताचे पिढीसाठी प्रेरणादायी आहे.नेतृत्व ही सर्वसामान्य व समाविष्ट असावे असे महाराजांचे विचार आहेत.
महाराजांच्या गनिमीकाव्याला जगाने गौरवलेले अभिनव युद्धतंत्र नाविन्याचा अविष्कार आहे. कामातले अचूकता शक्तिस्थळे व कमतरता शत्रूवर मात करण्यासाठी काहीतरी नवीन करण्यावर त्यांचा भर होता. आपल्याकडे असलेल्या गोष्टी नाविन्यपूर्ण करण्याचा धडा महाराजांनी आपल्याला शिकवला.दादाजी कोंडदेव हे त्यांचे गुरू होते तलवार चालवणे,दांडपट्टा फिरविणे,घोड्यावर बसणे अशा अनेक खेळांमध्ये शिवरायांना तरबेज केले.शिवरायांनी बारा वर्षापर्यंत अनेक कला,विद्या यांच्याशी परिचित झाले.स्वाभाविक नेतृत्वाची गुणवत्ता ओळखून ते अनेक खेळात तरबेज झाले.प्रत्येक वेळी जिंकू किंवा यशस्वी होऊ असे होत नाही तर जिंकण्यासाठी चार पावले माघार घ्यावी लागते. महाराजांच्या विचारांचा माघार घेणे म्हणजे क्षणभराची विश्रांती घेणे.तरच आपले काम होते.
प्रशासनात पारदर्शकता असल्याशिवाय जनतेचा विश्वास संपादन होत नाही.आपले काम किती चांगले हे लोकांचा आनंद होत असते .कर-रचना, स्त्रियांची सुरक्षितता, धर्माचा आदर, न्यायप्रियता यातून प्रशासन सांभाळले. तर आपल्या यशस्वी व्हायचे असेल तर कामात योग्य प्रशासन असणे महत्त्वाचे ठरते . हा शिवविचार विचार मोलाचा संदेश देतो.
आपण जे खातो ते दृष्टीने आपल्याला दिसत नसतानाही पाहतो ती दूरदृष्टी .समुद्रातील आरमार हे शिवविचारातील एक मोठे उदाहरण आहे. यशस्वी होण्यासाठी माणसाने सध्याचा विचार न करता येणाऱ्या अडचणी व संधी यांचा विचार केला पाहिजे.एखादी गोष्ट करण्यासाठी योजना किती महत्त्वाचे असते शिवरायांनी आपल्या प्रत्येक मोहिमा फत्ते करण्यासाठी योजना आखली होती. येणारे धोके जाणून घेणे आयुष्याचा खूप मोठा भाग आहे .फक्त युद्ध लढाई जिंकता येत नाही तर त्याचा पाया योजनाबद्ध पूर्वतयारीत असतो.
छत्रपती शिवाजी महाराज जनतेच्या स्वातंत्र्याचे राजे होते.कर्तव्य,संघर्ष,प्रेरणा,धाडस,मार्गदर्शन,ऊर्जा,विश्वास,संयम,निष्ठा,नियोजन,नेतृत्व,युद्धतज्ञ,सामर्थ्य ,युक्ति,आत्मविश्वास मोठ्यांचा आदर,अध्यात्म,जन प्रियता यासारख्या अनेक पैलूंनी ते घडले या सर्व छटांचा चेहरा म्हणजे “युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज” होय. शिवजयंतीच्या निमित्ताने जन्मोत्सवाच्या या मंगलमय वातावरणात शिवविचार अंगी बाणवले तर आपल्या व्यक्तिमत्त्वाला संपन्न करणारी नवसंजीवनी ठरेल.
प्रत्येक मराठी माणसाला शिवछत्रपती आमचे राजे असलेला अभिमान आहे. शिवाजी महाराज हे फक्त राजे नव्हते तर एक स्वतंत्र नीतीमान आणि सुसंस्कृत समाजाचे शिल्पकार होते.
“जय भवानी! जय शिवाजी”!

शब्दांकन: सौ स्वाती धनराज जंगम.
टोपण नाव : स्वाती धन
(नागांव) कोल्हापूर.
टोपण नाव :(स्वाती धन)








































































