Last Updated on 07 Sep 2023 1:06 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोयना नगर येथील शिबीरात वाळवा तालुक्यातील 400 युवकांचा सहभाग
सांगली । वैचारिक मंथन,स्वावलंबन,निसर्गाच्या सानिध्यात भ्रमंती,विविध खेळ,गप्पा-गोष्टी आणि मनोरंजनाच्या उत्साही वातावरणात वाळवा तालुक्यातील युवकांचे दोन दिवसांचे कार्यकर्ता शिबीर सह्याद्रीच्या कुशीत कोयना नगर येथे मोठ्या उत्साहात पार पडले.युवा नेते,राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांच्या संकल्पनेतील या शिबिरात वाळवा तालुक्यातील साधारण 400 युवकांनी सहभाग घेतला.विचारांची बांधिलकी मानत निष्ठावंत कार्यकर्ता घडविण्यात अभ्यास शिबिरांचे योगदान मोलाचे असल्याची भावना प्रतिक पाटील यांनी व्यक्त केली.
वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या शिबिरात युवक राष्ट्रवादी,सोशल मिडिया आणि विद्यार्थी सेल,तसेच दुसऱ्या दिवशी महिला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.शिवम अध्यात्मिक व सांस्कृति क प्रतिष्ठानचे संस्थापक,जेष्ठ विचारवंत इंद्रजीत देशमुख,ऋषिकेश पवार पुणे,अभिजित कोळी कुंडल,वक्ता सेलचे सांगली जिल्हाध्यक्ष संतोष जाधव यांनी विविध विषयांवर मार्गर्शन केले.प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले.
जेष्ठ विचारवंत इंद्रजीत देशमुख म्हणाले, देशातील सद्य परिस्थिती विदारक आहे. ती बदलण्याची ताकद युवकांमध्ये आहे. युवा कार्यकर्ता हा सामाजिक बांधिलकी मानणारा हवा,त्याने तळागाळातील समाजाशी संवाद आणि संपर्क ठेवायला हवा. देशातील घडामोडीचे आकलन करायला शिका.
प्रतिक पाटील म्हणाले,वैचारिक बांधिलकी मानणारी युवकांची फळी उभा राहायला हवी. या शिबिरानंतर युवकांचे वागणे,बोलणे आणि कामात निश्चित फरक दिसेल. लोकशाही मूल्यावर विश्वास ठेवत आधुनिक समाज निर्मिती करण्यात युवकांचे योगदान महत्वाचे आहे.
ऋषिकेश पवार पुणे म्हणाले,आपण समाज माध्यमाचा प्रभावी वापर करून समाजाच्या विविध प्रश्नांवर लोकांच्या मनाला भिडतील अशा पोस्ट तयार करून सर्वत्र फिरवायला हव्यात. संतोष जाधव म्हणाले, तुम्हाला समाजात प्रभावी काम करायचे असेल,बोलायला यायला हवे. व्यासपीठावर उभा रहाण्याचे, थोडे-थोडे बोलण्याचे धाडस वाढवीत जावा. यावेळी अभिजित कोळी कुंडल यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या महा पुरुषांच्या स्वप्नातील भारत युवकांच्यासमोर उभा केला. तसेच जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियान चे संघटक संदीप साठे वाटेगाव यांनी अभियानच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब पाटील,संजय पाटील,छाया पाटील,सुस्मिता जाधव,सुनिता देशमाने,रोझा किणीकर, तेजश्री बोंडे,सचिन कोळी,स्वरूप मोरे, शिवाजी चोरमुले,सचिनकाका पाटील यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शिबिरात सहभागी झाले होते. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव,कार्याध्यक्ष देवराज देशमुख, सोशल मिडियाचे तालुकाध्यक्ष सुशांत कोळेकर,उपाध्यक्ष विशाल माने,विद्यार्थी सेलचे तालुकाध्यक्ष राजकेदार आटूगडे, कार्याध्यक्ष सुशांत कुराडे यांनी अभ्यास शिबिराचे उत्तम संयोजन केले.
स्व.बापूंची प्रकर्षाने आठवण
लोकनेते राजारामबापू पाटील यांनी आपल्या राजकीय आयुष्यात सातत्याने अभ्यास शिबिरे घेऊन राज्यात युवकांची एक फळी उभा केली. आता त्यांचे नातू प्रतिकदादा पाटील हे स्व.बापूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत अभ्यास शिबिरे घेत आहेत. यावेळी स्व.बापूंच्या आठवणींना जेष्ट कार्यकर्त्यांनी उजाळा दिला.












































































