Last Updated on 14 Jul 2022 4:53 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई |
इंग्लडविरुद्धची वनडे मालिका संपल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे.या दौऱ्यात उभय संघ 3 सामन्यांची वनडे आणि 5 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहेत.यातील टी20 मालिकेसाठी गुरुवारी (14 जुलै) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 18 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
या मालिकेसाठी भारतीय फलंदाज विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे. 29 जुलैपासून त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.

रवी बिश्नोई या 21 वर्षीय युवा फिरकीपटूवर संघ व्यवस्थापनाने विश्वास दाखवला आहे.बिश्नोईबरोबर अनुभवी रविंद्र जडेजा,अक्षर पटेल यांनाही संधी दिली गेली आहे.तसेच कुलदीप यादव आणि आर अश्विन या वरिष्ठ फिरकीपटूंचेही संघात पुनरागमन झाले आहे.कुलदीपची उपलब्धता त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल.त्याला मागील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेवेळी नेट्समध्ये सराव करताना हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. तर अश्विन जवळपास 8 महिन्यांनंतर टी20 संघात पुनरागमन करेल.
असा आहे भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदिप यादव, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
केएल राहुल आणि कुलदीप यादव (फिटनेसबाबत अनिश्चितता)
उभय संघातील या टी-२० मालिकेत रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करेल, तर वनडे मालिकेत शिखर धवनकडे कर्णधारपद सोपवले गेले आहे.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघ आधीच घोषित केला होता.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडला गेलेला भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड,शुभमन गिल,दीपक हुड्डा,सूर्यकुमार यादव,श्रेयस अय्यर,ईशान किशन (यष्टीरक्षक),संजू सॅमसन (यष्टीरक्षक),शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल,अक्षर पटेल, आवेश खान,प्रसिद्ध कृष्णा,मोहम्मद सिराज,अर्शदीप सिंह.








































































