Last Updated on 30 Dec 2024 7:01 PM by Sanjay Patil/Adhorekhit
माजी मंत्री आ. सदाभाऊ खोत यांची ग्रामविकास मंत्र्यांकडे मागणी
मुंबई । गावातील विविध मंजूर विकास कामांसाठी आवश्यक असलेली ग्रामपंचायतच्या ठरावाची प्रत किंवा NOC ची अट काढून टाकण्याबाबत माजी मंत्री आ. सदाभाऊ खोत यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली.
गावागावात विविध लेखाशीर्ष अंतर्गत कामे मंजूर होत असतात. परंतु या मंजूर कामांसाठी ग्रामपंचायतीचा ठराव किंवा ना हरकत दाखला आवश्यक असतो. अनेक ग्रामपंचायती विरोधकांच्या ताब्यात असल्यामुळे ते ग्रामपंचायतीचा ठराव किंवा ना हरकत पत्र देत नाहीत. या कारणामुळे गावातील विकास कामे करण्यास अडथळा निर्माण होत आहे. काम न झाल्यामुळे एकतर तो निधी तसाच पडून राहतो किंवा लॅप्स होतो.
ही परिस्थिती लक्षात घेता गावातील मंजूर विकास कामांसाठी ग्रामपंचायतच्या ठरावाची किंवा ना हरकत दाखल्याची अट काढून टाकण्याबाबतची विनंती आ. सदाभाऊ खोत यांनी निवेदनाद्वारे केली.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 24 Aug 2026 8:44 PM by Sanjay Patil/Adhorekhit आतापर्यंत १२,५८,२४३ शेतकऱ्यांना ₹१०,११५ कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती या योजनेच्या दुसऱ्... Read more













































































