Last Updated on 10 Mar 2024 10:51 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटना व रयत क्रांती पक्षाची विस्तारित राज्य कार्यकारणीत केले जाहीर
पुणे । पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत रयत क्रांती संघटना खांद्यांना खांदा लावून महायुतीच्या सोबत असेल असे सांगत माजी मंत्री,शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.तसेच हातकणंगलेमधून लोकसभा निवडणुक लढणार असल्याचेही सदाभाऊ खोत यांनी जाहीर केले आहे.
माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली रयत क्रांती संघटना व रयत क्रांती पक्षाची विस्तारित राज्य कार्यकारणी जाधवर एज्युकेशन कॅम्पस, पुणे येथे संपन्न झाली.या बैठकीत खोत यांनी आपली भूमिका मांडली. बैठकीत संघटना वाढीवर सविस्तर चर्चा झाली. राज्यभरातून आलेले सर्व तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, विभागीय अध्यक्ष, प्रमुख नेते यांच्याकडून लोकसभेच्या अनुषंगाने तेथील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला.
येणाऱ्या निवडणुकीत भारत विरुद्ध इंडिया असा सामना लढताना आपण भारतातील कष्टकरी गोरगरीब शेतकऱ्यांची बाजू लढत राहायचे आहे,असे सांगत खोत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर विचार मंथन केले.हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने बैठकीत एक मताने “हम लढेंगे भी और जितेंगे” असे सांगत रयत क्रांती संघटनेला हा मतदारसंघ सोडावा,असा ठराव करण्यात आला.

तसेच खालील महत्त्वाचे ठराव देखील करण्यात आले.
१) आदरणीय पंतप्रधान मोदी सरकारने २०२१ साली पारित केलेल्या तीन कृषी विधेयक कायद्यांना पुन्हा एकदा लागू करावे. व या कायद्यांना रयत क्रांती संघटनेचा पूर्णपणे पाठिंबा आहे.
शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य कायदा 2020,
शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा 2020,
अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) कायदा 2020.
२) आयात-निर्यात धोरण पाच वर्षासाठी ठरवावे व ते धोरण शेतमालावर – बाजारपेठेवर थेट परिणाम करणारे नको.
३) रोजगार हमी योजनेअंतर्गत शेती विषयक कामे समाविष्ट करावी.
४) शेती पूरक व्यवसायाला चालना देण्याकरिता शेतकऱ्यांच्या फार्मर प्रोड्यूसर कंपन्यांना सशक्त करावे व त्या अंतर्गत शेतमाल प्रक्रिया उद्योगाला व निर्यातीला चालना द्यावे.
५) शेतकऱ्यांना शेतीपंपा ला 10 HP पर्यंत मोफत वीज द्यावी किवा शेतकऱ्यांचे 100% टक्के शेती पंप सोलर वरती करावी.
6) शेतकरी महिलेला दरमहा 1000/- थेट त्यांच्या खात्यामध्ये अनुदान म्हणून जमा करावे.
७) दोन साखर कारखान्यांमधील 25 किलोमीटरचे अंतर काढावे.
८) अत्यावश्यक वस्तू कायदा रद्द करावा व सर्व शेतमालावरतील निर्बंध काढण्यात यावेत.
९) महायुती सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देऊन ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल महायुतीचे हार्दिक अभिनंदन.
१०) मुलींच्या उच्च शिक्षणाच्यादृष्टीने राज्य सरकारने जवळपास 600 कोर्सेससाठी १००% फी माफ केल्याबद्दल महायुतीचे हार्दिक अभिनंदन.
११) हातकणंगले लोकसभेची जागा रयत क्रांती संघटनेला देण्यात यावी.
१२) महायुतीतील घटक पक्ष म्हणून रयत क्रांती संघटनेला सत्तेचा वाटा मिळावा.
१३) “फिर एक बार मोदी सरकार” – पुन्हा एकदा आदरणीय नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत रयत क्रांती संघटना खांद्यांना खांदा लावून महायुतीच्या सोबत असेल.












































































