Last Updated on 11 Nov 2024 7:27 PM by Sanjay Patil/Adhorekhit
बीड । लोकसभेत होते ते प्रश्न विधानसभा निवडणुकीच्या काळातही कायम आहेत, राज्य सरकारनं राज्याच्या तिजोरीत गोंधळ केला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
बीड इथं आज आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळेच सरकारनं हजारो कोटी रूपयांची आश्वासनं दिली आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
राज्यात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून राज्यात येणारे अनेक उद्योग, प्रकल्प गुजरातला जाताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न का नाही केला? असा प्रश्न पाटील यांनी केला. तर जिल्ह्यातून ज्यांना निवडून दिलं त्यांनी जिल्ह्याचा विकास केला नाही, असा अप्रत्यक्ष टोला पाटील यांनी धनंजय मुंडे यांना लगावला.
आ. पाटील म्हणाले, निवडून येण्यासाठी राज्य सरकारने प्रचंड भुरटेपणा केला आहे. तिजोरीत पैसा नाही आणि योजनांचा वर्षाव केला. सगळ्या ऑर्डर पास केल्या. यांची विधायक आणि विकासाची भाषा नाही. “बटेंगे तो कटेंगे” यापेक्षा यांच्या बुद्धीची मर्यादा पुढे जात नाही.












































































