Last Updated on 18 Oct 2022 8:50 PM by Sanjay Patil/Adhorekhit
हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज
सीतरंग’ चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता;आता चक्रीवादळाचे सावट
मुंबई | परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे.दरम्यान,हवामान खात्याकडून दिलासादायक बातमी मिळाली आहे.राज्यात मान्सून, माघारीसाठी अनकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.विदर्भ, छत्तीसगड, महाराष्ट्र,ओडिशाचा काही भाग आणि संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये मान्सून परतीस पोषक वातावरण निर्माण झाले असून,पुढच्या 24 तासांत मान्सून माघारी परतणार असल्याची दाट शक्यता हवामान खात्याने दिली आहे.दुसऱ्याबाजूला बंगालच्या उपसागरात 20 आणि 21 ऑक्टोबरपर्यंत सीतरंग’ चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता आहे.

पावसाने मुंबई, पुणे, कोल्हापूर, मराठवाड्यासह पार दैना उडाली होती.यंदा हवामान बदलामुळे अजूनदेखील मान्सून बरसत आहे. अखेर मान्सूनने माघारी जाण्याची तयारी केली आहे. पण मध्य महाराष्ट्र, कोकण-गोव्यात 19 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षातील अंदाजानुसार, 10 ऑक्टोबर पूर्वीच मान्सून माघार घेतो. पण यावर्षी मात्र मान्सूनने आपला मुक्काम लांबवला आहे. 18 ऑक्टोबरपर्यंत तरी मान्सून परतलेला नाही, पण येत्या दोन दिवसात मान्सून परतणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे.
राज्यात धुमाकूळ घालणारा परतीचा पाऊस आता लवकरच निरोप देणार आहे.तसा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. पुढच्या 24 तासांत मान्सून माघारी परतणार असल्याची दाट शक्यता हवामान खात्याने दिली आहे.
Tweet

ब्रेकिंग…
आता चक्रीवादळाचे सावट

दरम्यान,दरम्यान,एकाबाजूला पुढच्या 24 तासांत मान्सून माघारी परतणार असल्याची दाट शक्यता हवामान खात्याने दिली असतानाच दुसऱ्याबाजूला बंगालच्या उपसागरात 20 आणि 21 ऑक्टोबरपर्यंत सीतरंग’ चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता आहे.सीतरंग चक्रीवादळाचे मार्गक्रमण कसे असेल, हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.
मंगळवारी सकाळी कोलकाता येथील आयएमडीच्या प्रादेशिक हवामान केंद्राने बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार असल्याची माहिती दिली आहे. सोमवारी दक्षिण अंदमान समुद्र आणि त्याच्या आसपासच्या परिसरात सौम्य चक्रीवादळ निर्माण झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. आज सकाळपर्यंत हे वादळ उत्तर अंदमान समुद्र परिसरात होते,अशी माहितीही कोलकता येथील प्रादेशिक हवामान केंद्राने दिली.या वादळाची दिशा नेमकी कशी असेल? याबाबत आताच भाष्य करणं खूप घाईचे असेल,असे मत हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.












































































