Last Updated on 18 Mar 2022 8:22 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मार्चमध्ये जन्मलेले लोक असतात आकर्षक आणि मनमिळाऊ
एखाद्या व्यक्तीचा जन्म कोणत्या महिन्यात झाला,याच्या आधारे त्याच्या/तिच्या बलस्थाने आणि व्यक्तिमत्त्वाची कल्पना येऊ शकते.वर्षाचा तिसरा महिना म्हणजे मार्च सुरू झाला आहे.या महिन्यात अनेकांचे वाढदिवस येतात.ज्याप्रमाणे वैदिक ज्योतिषात,नवग्रह आणि नक्षत्र इत्यादींवरून कोणत्याही व्यक्तीचे भविष्य आणि स्वरूप जाणून घेता येते.दुसरीकडे,ज्योतिषशास्त्रानुसार,आपल्या जन्माचा महिना आपल्या जीवनाशी संबंधित अनेक रहस्ये सांगतो.आपण मार्च महिन्यात जन्मलेल्या लोकांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या लोकांचा मार्च महिन्यात वाढदिवस असतो त्यांच्यामध्ये काही गुण आढळतात.मार्च महिन्यात जन्मलेल्या लोकांच्या स्वभाव आणि गुणांबद्दल ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून जाणून घेऊया…
सुस्वभावी
मार्च महिन्यात जन्मलेले लोक मनाने कोमल असतात.असे म्हणतात की या महिन्यात जन्मलेले लोक परोपकारी,दानशूर आणि धार्मिक स्वभावाचे असतात.असे लोक धर्म आणि समाजहिताच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतात.इतकेच नाही तर मितभाषी असल्यामुळे असे लोक अनोळखी लोकांशी सहज मैत्री प्रस्थापित करतात.
कुशाग्र बुद्धी
मार्चमध्ये जन्मलेल्या लोकांची बुद्धी खूप कुशाग्र असते.अशी माणसे मनाने इतकी कुशाग्र असतात की त्यांना फसवणे प्रत्येकाच्याच अंगात नसते.तसेच हे लोक कोणतेही कट उधळून लावण्यात माहीर असतात.याशिवाय एकदा त्यांचा विश्वास तुटला की तो परत मिळवणे कठीण असते,असे म्हटले जाते.
प्रामाणिक
मार्च महिन्यात जन्मलेले लोक नातेसंबंध जपण्यात तज्ञ असतात.जोडीदाराबद्दल त्यांच्या हृदयात अपार प्रेम असते.ते कधीही त्यांच्या जोडीदाराची फसवणूक करत नाहीत.तसेच असे लोक प्रतिकूल परिस्थितीतही जोडीदाराची साथ सोडत नाहीत.
सकारात्मक विचार
मार्चमध्ये जन्मलेले लोक खूप आनंदी आणि सकारात्मक विचारांचे असतात. त्यामुळेच आजूबाजूला राहणाऱ्या लोकांची विचारसरणीही सकारात्मक बनते.
शुभ अंक – 3,7,9
शुभ रंग – हिरवा, पिवळा आणि गुलाबी
शुभ दिवस – रविवार, सोमवार आणि शनिवार












































































