Last Updated on 30 Apr 2023 5:47 PM by Sanjay Patil/Adhorekhit
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतिहासातील सर्वात मोठी भरती प्रक्रिया
4 लाख 67 हजार 85 उमेदवारांना परीक्षेसाठी प्रवेश
राज्यातील 37 जिल्हा केंद्रावरील एकूण 1,475 परीक्षा उपकेंद्रे
मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतिहासातील सर्वात मोठी भरती प्रक्रियेतील महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत पार पडली असल्याचे लोकसेवा आयोगाने म्हटले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 आयोजित करण्यात आली. या परीक्षेकरिता एकूण 4 लाख 67 हजार 85 उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. त्यांच्या बैठक व्यवस्थेकरिता राज्यातील 37 जिल्हा केंद्रावरील एकूण 1,475 परीक्षा उपकेंद्रे निश्चित करण्यात आली होती. या पूर्व परीक्षेकरिता साधारणपणे 80 टक्के उपस्थिती असल्याचे दिसून आले असून परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यात आली आहे.
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 परीक्षेमधून राज्य शासनाच्या विविध विभागातील एकूण 8,169 पदे भरली जाणार आहेत.आयोगामार्फत आतापर्यंतची ही सर्वात मोठी भरती असून अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची संख्या देखील आयोगाच्या इतिहासातील सर्वोच्च संख्या आहे.












































































