Last Updated on 03 Dec 2023 9:00 PM by Sanjay Patil/Adhorekhit
जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत पाचव्या क्रमांकाचे बक्षिस पटकविलेल्या किरणचे आ. पाटील यांनी केले तोंडभरून कौतुक
सांगली । स्पेन देशातील जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत भारत देशाचे प्रतिनिधित्व करीत पाचव्या क्रमांकाचे बक्षिस पटकविलेल्या वाळवा तालुक्यातील बोरगावचा सुपुत्र किरण मोहनराव शिंदे याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी सत्कार करून त्याचे तोंडभरून कौतुक केले.या स्पर्धेत बक्षिस पटकविलेल्या हा भारत देशातील पहिला शरीर सौष्ठवपटू आहे.
याप्रसंगी प्रांताधिकारी अर्जुन श्रीनिवास, तहसिलदार प्रदीप उबाळे,वडील मोहनराव शिंदे,राजारामबापू सहकारी दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील,संजय पाटील,शहाजी पाटील,संग्राम जाधव,संचालक कार्तिक पाटील,शैलेश पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
आयएफबीबी या आंतरराष्ट्रीय संस्थेने स्पेन देशातील बार्सिलीना शहरात या स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेत जगातील १३५ देशांनी सहभाग घेतला होता.किरण यांनी ७० किलो वजन गटात पाचवा क्रमांक पटकाविला आहे.या गटात कोरिया,तुर्कीस, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी पहिले क्रमांक पटकाविले आहेत.यापूर्वी त्याने २०२२-२३ मध्ये युनिव्हर्स गोल्ड,तसेच सलग तीन ३ वर्षे ज्युनिअर भारतश्री,आणि सलग ३ वर्षे सिनिअर भारतश्री किताब पटकाविला आहे.
इस्लामपूर येथील चान्सलर्स फिटनेस क्लबमध्ये तो सर्व करीत आहे.तो स्वतः जिम मालकही आहे.त्यास इंडिया बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष संजय मोरे, आंतर राष्ट्रीय पंच रामकृष्ण चितळे सांगली,पंच रविंद्र आरते,तसेच आई-वडील व भावांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभत आहे.








































































