Last Updated on 31 Jan 2022 9:14 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
प्लास्टिकचा वापर कमी व्हावा या उद्देशाने बहे (ता.वाळवा) ग्रामपंचायतीने प्लास्टिक कचरा विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.या मोहिमेचा शुभारंभ रविवारी गटविकास अधिकारी डॉ आबासाहेब पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
बहे ग्रामपंचायतीला आतापर्यंत राज्यपातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.आता हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.गावात प्लास्टिकचा वापर कमी व्हावा यासाठी ग्रामस्थांकडून प्लास्टिक कचरा विकत घेतला जाणार आहे.स्वच्छ प्लास्टिक १० रुपये प्रति किलो दराने महिन्याच्या १५ व ३० तारखेला ग्रामपंचायत मार्फत खरेदी केले जाणार आहे.
या मोहीम शुभारंभप्रसंगी सहाय्यक गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार,राजारामबापू कारखान्याचे संचालक विठ्ठल पाटील,बहे सोसायटीचे माजी सभापती शिवाजीराव पाटील,प्रा.शशिकांत पाटील,सरपंच सौ. छायाताई पाटील व उपसरपंच सौ. अर्चना दमामे,माजी उपसरपंच मनोज पाटील,सयाजी पाटील,संतोष दमामे,अशोक देशमुख,हणमंत पाचुंब्रे, जालिंदर देशमुख,अरविंद थोरात,ग्रामपंचायत सदस्य शिवाजीराव पाटील,रोहित तोरस्कर,कालिदास पाटील,रामचंद्र पाटील,बबन शिरतोडे,प्रवीण फल्ले,ग्रामसेवक सागर मोकाशी,दिलीप बाबर,आनंदा मुळीक आदी उपस्थित होते.
यावेळी स्वागत प्रा.शशिकांत पाटील यांनी केले.प्रास्ताविक ग्रामसेवक सागर मोकाशी यांनी केले. आभार मनोज पाटील यांनी मानले.यावेळी ग्रामस्थांकडून जमा झालेले प्लास्टिक ग्रामपंच्यातीने विकत घेतले.स्वच्छ प्लास्टिक १० रुपये प्रति किलो दराने महिन्याच्या १५ व ३० तारखेला ग्रामपंचायत मार्फत खरेदी केले जाणार आहे.लोकांनी जमा केलेले प्लास्टिक त्या-त्या भागात जाऊन ग्रामपंचायत ते विकत घेणार आहे.भविष्यात सांडपाणी व्यवस्थापणाचा कार्यक्रम ग्रामपंचायतीने हाती घ्यावा,पंचायत समितीस्तरावरून आम्ही सहकार्य करू असे गटविकास अधिकारी डॉ आबासाहेब पवार यांनी यावेळी सुचविले.संपूर्ण माहिती घेवून यादृष्टीने प्रयत्नशील राहू असे सरपंच सौ. छायाताई पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा…
बहे ग्रामपंचायतीचा अनोखा प्रयोग;ग्रामस्थांकडून प्लास्टिक घेणार विकत
https://adhorekhit.com/?p=8368














































































