Last Updated on 16 Jun 2023 2:26 PM by Sanjay Patil/Adhorekhit
‘बिहार पॅटर्न’च्या माध्यमातून राबवली जाणार योजना : पहिल्या टप्प्यात 1 हजार वृक्षांची लागवड
अधोरेखित ऑनलाइन डेस्क । पश्चिम महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील रामलिंग बेटावर 2 हजार वृक्ष लागवड करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.पहिल्या टप्प्यात 1 हजार वृक्ष लागवड होणार आहे.बिहार पॅटर्नच्या माध्यमातून ही वृक्ष लागवड होणार आहे.
बिहार पॅटर्न नुसार महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या साहाय्याने ही वृक्ष लागवड केली आहे.वृक्षारोपणाचा फायदा या परिसराला भविष्यात होणार आहे.वाळवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांच्या संकल्पनेतून आणि बहे ग्रामपंचायत व रामलिंग बेट देवस्थान समितीच्या सहकार्यातून ही वृक्ष लागवड होत आहे.
रामलिंग बेटावर एकूण २ हजार वृक्षांची लागवड होणार आहे.दोन-तीन टप्प्यात ही वृक्ष लागवड होणार असून पहिल्या टप्प्यात १ हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे.येत्या पावसाळ्यानंतर प्रत्यक्षात या कामास सुरवात होईल अशी माहिती सरपंच संतोष दमामे,उपसरपंच हणमंत पाटील व रामलिंग बेट देवस्थान समितीच्या अध्यक्षा विजयमाला संजय पाटील यांनी दिली.
बहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकासकामांबरोबरच प्लास्टिक मुक्ती,डासमुक्ती अशा विविध योजना राबवण्यात येत आहेत.आणि आता रामलिंग बेटावर २ हजार वृक्ष लागवड करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.या महत्वाकांक्षी वृक्षलागवडीचा शुभारंभ गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांच्या हस्ते नुकताच प्रातिनिधिक स्वरूपात वडाच्या वृक्षारोपण करून करण्यात आला.
बिहार पॅटर्नच्या माध्यमातून या वृक्षांची तीन वर्षे झाडांची देखभाल,संगोपन करण्यात येणार आहे.रामलिंग बेटावर या योजनेअंतर्गत बांबू,नीम,बाभूळ,आवळा,सिताफळ,चिंच,जांभूळ,खैर,आंबा यासारखी सुमारे २२ प्रकारची झाडे लावली जाणार आहेत.वृक्षारोपणाचा फायदा त्या परिसराला भविष्यात होणार आहे.एकूणच यामुळे पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.

बहे : रामलिंग बेटावर वृक्ष लागवडीचा शुभारंभ करताना गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार.बाजूस सहाय्यक गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार,तालुका कृषी अधिकारी संजय बुवा,’रोहयो’चे अमोल पवार,कृष्णा कांबळे,सरपंच संतोष दमामे आदी
तीन वर्षे झाडांची देखभाल,संगोपन
झाडे जगण्याचे प्रमाण वाढले.यापूर्वी झाडे लावल्यानंतर देखभाल होत नसल्याने झाडांची दुर्दशा होत होती.मात्र,आता बिहार पॅटर्नमुळे सतत तीन वर्षे झाडांची देखभाल आणि संगोपन केले जात असल्याने झाडे जिवंत राहण्याचे प्रमाण शंभर टक्के झाले आहे.
अमोल पवार,
सहाय्यक कार्यक्रम अधिकारी,
रोहयो,वाळवा पंचायत समिती,इस्लामपूर












































































