Last Updated on 24 Jun 2023 6:01 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । प्रत्येक गावाने स्वतः स्वयंपूर्ण होणे महत्त्वाचे आहे.गावांसाठी लागणाऱ्या ऊर्जेसाठी सोलर प्रकल्प,सोलर हिटर,खतांसाठी गांडूळ खत निर्मिती,गॅसची कमतरता असेल तर बायोगॅस आणि शेतमाल शेतातून बाहेर काढण्यासाठी पाणंद रस्ते आदी माध्यमातून प्रत्येक गाव स्वयंपूर्ण होऊ शकते असा विश्वास वाळवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ आबासाहेब पवार यांनी व्यक्त केला.
खरातवाडी (ता.वाळवा) येथे पाणंद रस्त्याच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.यावेळी रोजगार हमी योजनेचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी अमोल पवार,सरपंच कांचन वेटम,उपसरपंच अर्जुन खरात,तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष भानुदास खरात आदी प्रामुख्याने उपस्थित होते.रोजगार हमी योजनेतून सलगर वस्तीकडे जाणारा पाणंद रस्ता,कृष्णराव खरात यांच्या शेतापासून रेठरे हरणाक्ष रस्ता,बारबिगा पाणंद रस्ता,पोलीस पाटील वस्ती ते सलगर वस्ती असे चार पाणंद रस्ते होणार आहेत.
डॉ. पवार म्हणाले, गावांसाठी लागणाऱ्या ऊर्जेसाठी सोलर प्रकल्प,सोलर हिटर,खतांसाठी गांडूळ खत निर्मिती,गॅसची कमतरता असेल तर बायोगॅस,वृक्ष लागवड आणि शेतमाल शेतातून बाहेर काढण्यासाठी पाणंद रस्ते आदी माध्यमातून प्रत्येक गाव स्वयंपूर्ण होऊ शकते.शेतमाल योग्य वेळेत बाजारपेठेमध्ये पोहोचण्यासाठी रस्ता आवश्यक असतो.गावातील सर्व पानंद रस्ते आपल्याला रोजगार हमी योजनेतून करता येतील जेणेकरून शेतकऱ्याला शेतमाल बाहेर काढण्यास कोणतीही अडचण होणार नाही व आपल्याला हक्काचा रस्ता व ग्रामपंचायतीची मालमत्ता तयार होईल शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर झाडे लावणे आवश्यक आहे.प्रत्येक गावाने स्वतः स्वयंपूर्ण होणे महत्त्वाचे आहे.गावात गॅसची कमतरता असेल तर बायोगॅस घेऊ शकतो.रोजगार हमीतून बायोगॅससाठी १०० टक्के अनुदान मिळत आहे.
यावेळी माजी सरपंच रामचंद्र खरात,जगदीश काकडे,नारायण खरात,विकास खरात,ग्रामसेवक पूनम निकम,किरण पाटील,प्रमोद सुतार,शिवाजी मदने,अनिकेत लवटे,सर्जेराव सलगर,महादेव खरात,अशोक सलगर,महेश खरात,उदय खरात,अनिकेत लवटे,हणमंत खरात,अजित खरात तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.सुधीर खरात यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.विकास खरात यांनी आभार मानले.












































































