Last Updated on 19 Sep 2025 9:15 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ऑनलाईन मेडिटेशन उपक्रमात प्राचार्य जाधव यांचा मार्गदर्शक संदेश
सांगली । पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास ही आज काळाची गरज झालेली आहे. मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थी स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्यात यशस्वी होईलच असे नाही त्यासाठी आयुष्यात येणाऱ्या प्रसंगांना ही कसे सामोरे जावे याचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक असते.असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.ए.एम. जाधव यांनी ऑनलाईन मेडिटेशन उपक्रमाविषयी बोलताना केले.
विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अनेक अडथळे येत असतात जसे नकारात्मक विचार ,एकाग्रतेची कमतरता, झोप न येणे किंवा अति झोप, राग यांसारख्या अडथळ्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे अभ्यासावर पर्यायाने आयुष्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे त्यांना यावर मात करून आदर्श जीवनशैली कशी जगावी.यासाठी इस्लामपूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामार्फत ऑनलाईन मेडिटेशनचा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमामध्ये इयत्ता बारावी मधील विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले होते. सर्व विद्यार्थ्यांमध्ये झालेला सकारात्मक बदल, जगण्याकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन, एकाग्रतेत वाढ,रागावर नियंत्रण,शांत व पुरेशी झोप,ताण तणाव रहित जीवनशैली असे अनेक बदल विद्यार्थ्यांना स्वतः मध्ये झाल्याचे अनुभवातून सांगितले.त्यामुळे हा उपक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी झाला.
प्रा.स्वाती चव्हाण यांच्या संकल्पनेतून चालू झालेल्या या उपक्रमासाठी सुप्रिया मॅडम,सातारा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.यासाठी संस्थेचे मानद सचिव ॲड.बी एस.पाटील(अण्णा) आणि संस्थेचे सचिव ॲड.धैर्यशील पाटील यांचे मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली.












































































