Last Updated on 13 Nov 2024 7:36 PM by Sanjay Patil/Adhorekhit
लातूर । पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार केवळ खोटी आश्वासनं देतं, ही आश्वासनं कधीही पूर्ण केली जात नाहीत, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.
लातूर इथं आज अमित आणि धीरज देशमुख यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. देशात २ कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन मोदी यांनी दिलं होतं. मात्र, ते आश्वासन पूर्ण केलं नाही. केवळ अदानी आणि अंबानी यांच्यासारख्या मुठभर उद्योजकांना मोदी मोठं करत आहेत, असाही आरोप त्यांनी केला.
मराठवाडा सोयाबीनचं केंद्र आहे. मात्र, आज सोयाबीनला भाव नाही, शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, असं खरगे म्हणाले, ज्यांनी फसवणूक करुन सरकार बनवलं त्यांना घरी बसवण्याची वेळ आली आहे, असं सांगत महाविकास आघाडीला सत्तेत आणण्याचं आवाहन खरगे यांनी केलं. कर्नाटकमध्ये यशस्वी ठरलेली महालक्ष्मी योजना महाराष्ट्रातही लागू करु, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.












































































