Last Updated on 29 May 2023 5:37 PM by Sanjay Patil/Adhorekhit
अधोरेखित ऑनलाइन डेस्क । राज्यात मध्यंतरी महसूल विभागातील तसेच पोलीस दलातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या.पण,त्यानंतर पोलीस दलातील अजूनही काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत.राज्यातील पोलीस ठाण्यांच्या ठाणेदारांपासून ते त्यानंतरचे अनेक पोलीस अधिकारी बदल्यांच्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत आहेत.पोलीस दलातील अनेकांची ‘क्रीम पोस्टिंग’साठी धावाधाव सुरु होती.तर काहींची आजही सुरु आहे.बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये कही ख़ुशी,कही गम अशी अवस्था झाली आहे.
राज्यातील अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या बदल्या झाल्या.त्याचबरोबर पोलीस दलातील पोलीस अधीक्षकांच्या बदल्या झाल्या.पोलीस उपाधीक्षक,सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या नुकत्याच झाल्या.पण,पोलीस दलातील ठाणेदारांसह सहाय्यक निरीक्षक,उपनिरीक्षक आदी अधिकाऱ्यांच्या बदल्या अपेक्षित होत्या.पण,आजअखेर या बदल्या झालेल्या नाहीत.
मे महिना हा अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा कालखंड असतो.राज्यातील अजूनही अनेक अधिकारी बदल्यांच्या प्रतीक्षेत आहेत.बदल्यांची यादी तयार असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.पण,या बदल्यांना मुहूर्त मिळेना झाला आहे.बदल्यांचे घोडे मात्र अडले आहे.काही बदल्यांसाठी राजकीय नेत्यांचा दबाव असल्याचीही चर्चा आहे.त्यामुळेही बदल्यांची प्रक्रिया पुढे जात असल्याचीही चर्चा आहे.
राज्यातील अनेक अधिकाऱ्यांनी ‘क्रीम पोस्टिंग’ मिळण्यासाठी देव पाण्यात घातले होते अन् आहेत.तशी काहींनी फिल्डींग लावल्याचीही चर्चा होती.गेल्या काही दिवसांपासून बदलीसाठी अधिकाऱ्यांच्या मुंबई वाऱ्या वाढल्या होत्या.काही अधिकाऱ्यांच्या राजकीय नेते मंडळींशी भेटीगाठी सुरु असल्याचीही चर्चा सुरु आहे.तर काही नेतेमंडळी आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी प्रयत्नशील असल्याचे समजते.बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये कही ख़ुशी,कही गम अशी अवस्था झाली आहे.अपेक्षित ठिकाणी बदली न झाल्याने काही अधिकारी त्यांना अपेक्षित ठिकाणांसाठी पुन्हा प्रयत्न करू लागल्याची चर्चा आहे.
बदल्यांच्या सुरु असलेल्या प्रक्रियेत काहींना चांगल्या ठिकाणी ‘पोस्टिंग’ मिळाल्यामुळे अशा अधिकाऱ्यांमध्ये ‘ख़ुशी’ आहे.’क्रीम पोस्टिंग’च्या प्रयत्नात असलेल्या काही अधिकाऱ्यांना अपेक्षित ठिकाणी ‘पोस्टिंग’ न मिळाल्याने त्यांच्याकडे ‘गम’ अशी अवस्था आहे.संबंधित विभागातील आपला कार्यकाळ पूर्ण केलेले अधिकारी बदल्यांच्या प्रतीक्षेत आहेत.३१ मे च्या आत बदली प्रक्रिया होतील अशी त्यांना अपेक्षा आहे.पण,ऐनवेळी या ना त्या कारणाने बदल्या लांबवल्या जातील अशी चर्चा पोलीस वर्तुळात सुरु आहे.
पोलीस दलातील ठाणेदारांसह सहाय्यक निरीक्षक,उपनिरीक्षक यांच्या बदल्या या पोलीस महासंचालक स्तरावरील सर्वसाधारण बदली प्रक्रियेनंतर विभागस्तरावरच्या आणि त्यानंतर जिल्हा स्तरावरच्या बदल्या अपेक्षित असतात.वेळेत बदल्या झाल्या नाहीत तर पोलीस अधिकाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा नवीन ठिकाणी राहण्याचा व इतरही प्रश्न निर्माण होत आहे.त्यामुळे वेळेत बदली प्रक्रिया पार पडावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.येत्या दोन-तीन दिवसांत या बदल्या होतील अशीही चर्चा सुरु आहे.












































































