Last Updated on 11 Mar 2024 6:58 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । देशभरात आजपासून नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीएए कायदा आजपासून लागू झाला आहे.याची अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली आहे.लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.
मोदी सरकारने या कायद्याची अधिसूचना जारी केली आहे.सरकारच्या या निर्णयानंतर सीएए कायद्यात असलेले सर्व नियम देशभर लगू केले जाणार आहेत.केंद्र सरकारने हा कायदा लागू करण्यासाठी आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी एक विशेष पोर्टलदेखील तयार केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला जाईल अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन आठवड्यांपूर्वी नवी दिल्लीत आयोजित एका सभेत बोलताना केली होती.नागरिकत्व सुधारणा कायदा हा २०१९ मध्ये संसदेत संमत करण्यात आला आहे.
मोदी सरकारने लागू केलेल्या सीएएचे उद्दिष्ट ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी बांगला देश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चनांसह छळ झालेल्या गैर-मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व प्रदान करणे आहे.












































































