Last Updated on 31 Jul 2023 9:15 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई | दिव्यांग कल्याण विभागांतर्गत सर्व प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत राज्यात एकूण 932 अनुदानित दिव्यांग शाळा/कार्यशाळा व अनाथ मतिमंद बालगृहे कार्यरत आहेत.या विभागात शिक्षक व शिक्षकेतर संवर्गातील १,९१२ पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
शिक्षकीय 1 हजार 167 तसेच शिक्षकेतर 508 ही पदे नियमित स्वरुपात आणि 237 पदांना बाह्यस्त्रोताद्वारे अशा एकूण 1 हजार 912 पदांना भरण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे.या मान्यतेच्या अनुषंगाने या उपक्रमांतील पदभरतीसाठी ना-हरकत प्रमाणपत्र देऊन या पदभरतीची कार्यवाही विभागामार्फत सुरु करण्यात येणार आहे.यासंदर्भातील विभागाचा शासन निर्णय दि.26 जुलै 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.








































































