Last Updated on 20 Jul 2022 9:25 PM by Sanjay Patil/Adhorekhit
एप्रिलमध्ये ईएसआयसीशी जोडले गेले 12.67 लाख नवीन सदस्य
नवी दिल्ली ।
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही बातमी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारी ठरू शकते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि कल्याणकारी धोरणांमुळे देशात तरुणांसाठी रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत.
यामुळेच कर्मचारी राज्य विमा महामंडळात नवीन सदस्यांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे.कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या सामाजिक सुरक्षा योजनेत एप्रिल 2022 मध्ये सुमारे 12.67 लाख नवीन सदस्य समाविष्ट झाले आहेत.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ ) जारी केलेल्या अहवालानुसार, 2021 -22 मध्ये 1.49 कोटी लोक, कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या योजनांमध्ये सहभागी झाले तर 2020-21 मध्ये 1.15 कोटी नवीन सदस्य जोडले गेले.












































































