Last Updated on 03 Aug 2022 6:11 PM by Sanjay Patil/Adhorekhit
राज्यात ग्रामीण भागातील 71 टक्के घरांना नळाद्वारे पाणीपुरवठाआकांक्षित जिल्ह्यांना जल जीवन मोहिमेत प्राधान्य
मुंबई |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2019 रोजी लाल किल्यावरुन राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात ‘जल जीवन मोहीम-हर घर जल’ मोहिमेची घोषणा केली होती. 2024 पर्यंत देशाच्या ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळाद्वारे पाणीपुरवठा करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.
जल जीवन मोहिमेची यशस्वीरित्या अंमलबजावणी करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र अग्रणी राज्य आहे. राज्यात ग्रामीण भागातील एकूण 1.45 कोटी घरांपैकी 1.02 कोटी घरांना नळाद्वारे पाणीपुरवठा होत आहे. ग्रामीण भागात नळाद्वारे पाणीपुरवठ्याचे हे प्रमाण 71 टक्के एवढे उल्लेखनीय आहे. यापैकी योजनेची सुरुवात झाल्यापासून जल जीवन मिशनअंतर्गत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील 54.23 लाख (37.42 टक्के) घरांना नळजोडणी देण्यात आली आहे.

जल जीवन मोहिमेसाठी राज्यातील आंकाक्षित जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. 31 जुलै 2022 नूसार प्राप्त आकेडवारीनूसार, यात नंदूरबार (35 टक्के), गडचिरोली (60 टक्के), वाशिम (66 टक्के), उस्मानाबाद (77 टक्के) असे नळजोडणीचे प्रमाण आहे.

राज्यातील 78,800 शाळा (92 टक्के) आणि 85,174 (93 टक्के) अंगणवाडी केंद्रांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची सुविधा करुन देण्यात आली आहे.
पाण्याची चाचणी करण्यासाठीच्या प्रयोगशाळांच्या संख्येत महाराष्ट्र पश्चिम बंगालनंतर दुसऱ्या स्थानी आहे.














































































