Last Updated on 05 Nov 2023 3:53 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पूर्वभागातील या कायम दुष्काळी तालुक्यांचा समावेश नाही हे दुर्दैवी
या तालुक्यांच्या पाचवीला पुजला कायमचा दुष्काळ
सांगली । जिल्ह्याच्या पूर्वभागातील जत,आटपाडी व कवठेमहांकाळ या कायम दुष्काळी तालुक्यांचा राज्य शासनाच्या पहिल्या टप्प्यातील दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश करावा,अशी मागणी युवा नेते,राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीकदादा पाटील यांनी सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
राज्य शासनाच्या पहिल्या टप्प्यातील दुष्काळी तालुक्यांच्या यादीत जत,आटपाडी, कवठेमहांकाळ या कायम दुष्काळी तालुक्यांचा समावेश नसल्याबद्दल त्यांनी या पत्रात खंत व्यक्त केली आहे.
राज्य शासनाने राज्यात कमी पाऊसमान झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यांचा ‘दुष्काळी तालुके’ म्हणून घोषणा केली आहे.या यादीत सांगली जिल्ह्यातील मिरज,कडेगाव,खानापूर व शिराळा या तालुक्यांचा समावेश केलेला आहे. मात्र या पहिल्या यादीत जिल्ह्याच्या पूर्व भागातील जत,आटपाडी,कवठेमहांकाळ या कायम दुष्काळी तालुक्यांचा समावेश नाही,हे दुर्दैवी आहे.
हेही वाचा – इस्लामपूरच्या वाहतूक कोंडीबद्दल प्रतीकदादा आक्रमक…
या तालुक्यांच्या पाचवीला कायमचा दुष्काळ पुजला असून या तालुक्यां मध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. एकूण परिस्थितीचा विचार करून राज्य शासनाच्या पहिल्या यादीत सांगली जिल्ह्या च्या पूर्व भागातील जत,आटपाडी व कवठे महांकाळ या दुष्काळी तालुक्यांचा समावेश करावा,अशी मागणी प्रतीकदादा पाटील यांनी केली आहे.
हेही वाचा – मराठा कुणबी व कुणबी मराठा नोंदी शोधण्यासाठी प्रशासन लागले कामाला !












































































