Last Updated on 11 Nov 2022 7:00 AM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
मुंबई । राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली असून 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होणार आहे.
राज्यात ग्रामपंचायतींचा दिवाळीनंतर प्रत्यक्ष निवडणुकांचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.त्यानुसार अखेर या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे.त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील राजकारण तापू लागले आहे.![]()
असा असेल निवडणूक कार्यक्रम
🌑 तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक – दि. 18 नोव्हेंबर 2022 (शुक्रवार),
🌑 नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ – दि. 28 नोव्हेंबर 2022 (सोमवार) ते दि. 2 डिसेंबर 2022 (शुक्रवार) सकाळी 11 ते दुपारी 3.
🌑 नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ – दि. 5 डिसेंबर 2022 (सोमवार) सकाळी 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत.
🌑 नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ – दि. 7 डिसेंबर 2022 (बुधवार) दुपारी 3 वाजेपर्यंत.
🌑 निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ – दि. 7 डिसेंबर 2022 (बुधवार) दुपारी 3 वाजल्यानंतर.
🌑 आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक – दि. 18 डिसेंबर 2022 (रविवार) सकाळी 7.30 वाजल्यापासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत (मात्र नक्षलग्रस्त भागामध्ये उदा. गडचिरोली, गोंदीया जिल्ह्यांकरीता सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत).
🌑 मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाघिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील) – दि. 20 डिसेंबर 2022 (मंगळवार).
🌑 जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक – दि. 23 डिसेंबर 2022 (शुक्रवार) पर्यंत.![]()
अशी असेल आचारसंहिता
✪ ज्या जिल्ह्यामध्ये 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू राहील.
✪ ज्या तालुक्यात 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका आहेत त्या संपूर्ण तालुक्यात आचारसंहिता लागू राहील.
✪ निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींच्या सीमेलगतच्या गावांमध्येसुध्दा आचारसंहिता लागू राहील.
✪ सदर आचारसंहिता ही केवळ ग्रामीण क्षेत्रासाठी लागू असेल.तथापि, नागरी स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रासाठी सदर आचारसंहिता लागू नसली तरी ग्रामपंचायतींच्या मतदारांवर प्रभाव पडेल अशा प्रकारची कोणतीही कृती अगर भाष्य नागरी क्षेत्रात करता येणार नाही.
✪ निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील.
✪ या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती/घोषणा आचारसंहिता कालावधीत कुठेही करता येणार नाही.
✪ मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती,घोषणा मंत्री,खासदार,आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना आचारसंहिता कालावधीत कुठेही करता येणार नाही.![]()
विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या :
अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140, जालना- 266, कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली- 452, सातारा- 319, सिंधुदूर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196. एकूण- 7,751.![]()












































































