Last Updated on 11 Nov 2022 5:30 PM by Sanjay Patil/Adhorekhit
इस्लामपुर विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांना आवाहन
सांगली । भाजपा हा पक्ष देशातील शेवटच्या घटकापर्यत पोहचला आहे.प्रत्येक घटकाला केंद्रबिंदु मानुन भाजपा पक्षाने विविध योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत.भविष्यात ग्रामीण भाग विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी होणार्या निवडणुकीत प्रत्येक ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकवा,असे आवाहन उरुण- इस्लामपुर नगरपरीषदेचे माजी नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले – पाटील यांनी दिला.
ग्रामपंचायत निवडणुका व रविवारी सांगली येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित संघटनात्मक बैठकीच्या नियोजनाबाबत इस्लामपुर विधानसभा मतदार संघातील बुथ अध्यक्ष व शक्तीकेंद्रप्रमुख यांची बैठक प्रकाश शिक्षण व आरोग्य संकुलात आयोजीत करण्यात आली होती.यावेळी निशिकांत भोसले- पाटील बोलत होते.
यावेळी वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष धैर्यशील मोरे,सांगली जिल्हा भाजपाचे सरचिटणीस प्रसाद पाटील,संजय हवलदार,भाजपा शहर अध्यक्ष अशोकराव खोत,माजी नगरसेवक सुभाष शिंगण,वाळवा तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील,जिल्हा उपाध्यक्ष प्रविण माने,दादासाहेब रसाळ,संदीप सावंत,बबनराव शिंदे,संतोष घनवट,निवास पाटील,गजानन पाटील,प्रदिप पोळ,भास्कर मोरे,अजित पाटील,अक्षय पाटील,भाजपा शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष सतेज पाटील,आदींसह अन्य प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना निशिकांत भोसले-पाटील म्हणाले,ग्रामपंचायत निवडणुका भाजपा पक्षाच्या पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी एकत्रित येऊन मोठ्या ताकतीने लढा,भाजपाच्या संघटनात्मक कामामुळे निवडणुकीआधीच विरोधक एकवटले आहेत.आपण सर्वानी भाजपाने केलेल्या कामाचा व भविष्यातील गावाचा विकास हा अजेंडा घेऊन मतदारांपर्यत पोहचायचे आहेतालुक्यात कोणी दबावतंत्र वापरणार नाही,प्रशासन अधिकारी सर्व कायदेशीर कामकाज करतील.यामुळे स्वाभिमानाने व मोठ्या आत्मविश्वासाने निवडणुकांना सामोरे जा,भाजपा पक्ष आपल्या बरोबर आहे.
यावेळी गावनिहाय राजकीय परिस्थितीचा व निवडणुकीच्या व्युहरचनेचा आढावा निशिकांत भोसले- पाटील यांनी घेतला.यावेळी इस्लामपुर मतदार संघातील प्रत्येक गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी निवडणुकीतील तयारीबाबत आपली मते व्यक्त केली.
स्वागत व प्रास्थाविक वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष धैर्यशील मोरे यांनी केले.आभार सतेज पाटील यांनी मानले.सुत्रसंचलन विक्रम शिंदे यांनी केले.












































































