Last Updated on 09 Sep 2023 1:34 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । गोविंदा रे गोपाळा…म्हणत इस्लामपूर येथील ‘मुक्तांगण’ प्ले स्कूलच्या चिमुकल्यांनी दहीहंडी फोडली.गोकुळाष्टमी पार्श्वभूमीवर दहीहंडी साजरी करण्यात आली.राधा आणि श्रीकृष्णच्या वेशभूषेत आलेल्या चिमुकल्यांनी दहीहंडीच्या थरारक खेळाचा अनुभव घेतला.
इस्लामपूर येथील प्रशसकीय इमारती च्या परीसरात ‘मुक्तांगण’ मध्ये सहा वर्षाच्या आतील मुलांसाठी खेळांतून शिक्षण दिले जाते.विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून लहानपणा पासून मुलांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव दिले जातात.दहीहंडी कशी साजरी करतात , याची माहिती देताना दहिहंडी फोडण्यासाठी मुलांनी प्रयत्न केले.

राधा व कृष्णाच्या वेशभूषेत मुलं आली होती.राधांनी टीपरीचा फेर धरून आनंद साजरा केला.तर बालगोपाल दहिहंडी फोडण्यात चपळाई दाखवत होते. दहीहंडीच्या चित्रफीत दाखवून मुलांना माहिती देण्यात आली.

संचालिका वर्षाराणी मोहिते म्हणाल्या ‘मुलांच्यातील साहस वाढवणे,एकीचे महत्व पटवून देण्यासाठी दहिहंडी चा उपक्रम राबविण्यात आला.राधा व कृष्ण या व्यक्तीरेखा समजावून देण्यात आल्या’
धनश्री पाटील,आरती धोत्रे यांनी संयोजन केले.












































































