Last Updated on 27 Mar 2025 8:31 PM by Sanjay Patil/Adhorekhit
गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत केली घोषणा
नवी दिल्ली । केंद्र सरकार ओला, उबर च्या धर्तीवर सहकार टॅक्सी सुरु करणार आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत ही घोषणा केली. गेली साडेतीन वर्षे सहकार मंत्रालय यावर काम करत असून येत्या काही महिन्यात अतिशय मोठ्या प्रमाणात ही सहकारी तत्वावरची टॅक्यी सेवा सुरु केली जाईल. त्यात दुचाकी, टॅक्सी, रिक्षा, आणि चारचाकी वाहनांना नोंदणी करता येईल, आणि नफा थेट चालकाला मिळेल, असं त्यांनी सांगितलं. लवकरच एक सहकारी विमा कंपनीही स्थापन केली जाईल, असं ते म्हणाले.
अमित शहा यांनी लोकसभेत केली घोषणा
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा म्हणाले की, ओला-उबेरच्या धर्तीवर सहकारी टॅक्सी सेवा सुरू केली जाईल. अमित शहा यांनी लोकसभेत भाषण करताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘सहकारातून समृद्धी’ ही केवळ घोषणा नव्हे तर ते प्रत्यक्षात आणण्यासाठी गेल्या साडेतीन वर्षांपासून अथक प्रयत्न केले जात आहेत.
ते पुढे म्हणाले की, सरकार येत्या काही महिन्यांत लवकरच ओला-उबेर सारखे सहकारी टॅक्सी प्लॅटफॉर्म सुरू करणार आहे. या प्लॅटफॉर्मवर दुचाकी, रिक्षा आणि चारचाकी वाहनांची नोंदणी देखील केली जाईल. त्यांनी पुढे सांगितले की त्याचा नफा श्रीमंतांच्या हातात जाणार नाही… तर थेट ड्रायव्हरकडे जाईल.










































































