Last Updated on 17 Nov 2024 10:41 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । राज्यात २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा शांतता कालावधी मतदान संपण्यापूर्वी ४८ तास म्हणजेच सोमवारी १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेपासून सुरू होत आहे.
या कालावधीत दृकश्राव्य माध्यमे (टेलिव्हिजन, केबल नेटवर्क,रेडिओ, सोशल मीडिया) यावर शांतता कालावधीत मतदारांवर प्रभाव पाडणाऱ्या तसेच निवडणुकीच्या निकालावर परिणाम करू शकणाऱ्या बाबी प्रदर्शित करण्यास मनाई आहे.
हेही वाचा – विधानसभेसाठी निवडणुक यंत्रणा सज्ज!
राजकीय जाहिराती,कार्यक्रम, सार्वजनिक सभा, मिरवणुका आयोजित करण्यास बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.












































































