Last Updated on 30 Oct 2024 10:19 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । २८३, इस्लामपूर विधानसभा मतदार संघात आजअखेर २१ उमेदवारांचे २३ अर्ज दखल करण्यात आले.आज अखेरच्या दिवशी १५ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जुन व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटील यांनी दिली. दरम्यान, आज अर्ज दाखल उमेदवारांमध्ये प्रमुख उमेदवारांचे नामसाधर्म्य असणाऱ्या काही अर्जांचा समावेश आहे.
शेवटच्या दिवशी, दि २९ ऑक्टोबर २०२४ रोजी प्राप्त नामनिर्देशन पत्रे – १५ उमेदवार १५ अर्ज
०१) निशिकांत प्रकाश पाटील रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली
०२) राजेश शिवाजी गायगावाळे, रा. देवराष्ट्रे ता. कडेगाव, जि. सांगली
०३) अमोल विलास कांबळे, रा. महात्मा फुले कॉलनी,ताकारी रोड, इस्लामपूर, ता. वाळवा. जि.सांगली
०४) सतीश शिवाजी इदाते रा कापुसखेड नाका, माळ गल्ली, इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली
०५) चंद्रशेखर प्रकाश तांदळे रा. उरुण इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली
०६) जयंत राजाराम पाटील रा. सिद्धेश्वर चौक, पाटील गल्ली, उरुण इस्लामपूर ता वाळवा जि. सांगली
०७) जयंत रामचंद्र पाटील मु. पो. तांबवे, ता वाळवा जि. सांगली
०८) दत्तात्रय भाऊ गावडे, मु. पो. आष्टा ता वाळवा जि. सांगली
०९) दिग्विजय दिनकर पाटील रा. शिवाजीनगर येलूर, ता वाळवा जि. सांगली
१०) निशिकांत प्रल्हाद पाटील मु. पो. कोरेगाव ता वाळवा जि. सांगली
११) निशिकांत दिलीप पाटील मु. पो. बोरगाव ता वाळवा जि. सांगली
१२) बाबासाहेब गणपती पाटील, राधेय ब्राह्मणपुरी, इस्लामपूर, ता वाळवा, जि. सांगली
१३) विनायक हौशेराव शेवाळे, मु. पो. बहे, ता. वाळवा, जि. सांगली
१४) सागर हणमंतराव गुरव मलगुंडे, रा. संभाजी चौक, इस्लामपूर, जि. सांगली
१५) हणमंत विलासराव पाटील रा. शिगाव, ता वाळवा जि. सांगली
दि. २२ ऑक्टोबर २०२४ ते दि. २९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत प्राप्त एकूण अर्ज २३, उमेदवार संख्या २१
जयंत व निशिकांत पाटील नाव साधर्म्य असणारे तीन-तीन उमेदवार!
जयंत राजाराम पाटील (तुतारी वाजवणारा माणूस) विरुद्ध निशिकांत प्रकाश पाटील (घड्याळ) अशी एक अशी एक लढत होणार आहे. त्यामुळे निवडणूक चिन्ह कोणतेही असो दोन्ही गटाकडून नाव साधर्म्य असणाऱ्या प्रत्येकी दोघांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उरुण इस्लामपूर येथील जयंत राजाराम पाटील व तांबवे येथील जयंत रामचंद्र पाटील यांचा अर्ज आहे. तर निशिकांत प्रल्हाद पाटील (कोरेगाव) निशिकांत दिलीप पाटील (बोरगाव) असलेले अर्ज दाखल आहेत.












































































