Last Updated on 10 Sep 2023 7:41 PM by Sanjay Patil/Adhorekhit
लखीमपूर खेरी । उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर माकड त्याच्या घरी पोहोचले.मृतदेहावर पडलेली चादर काढून शेवटचे दर्शन घेतले.मग ते तिथेच पडून रडायला लागले.यानंतर ते महिलांच्या मांडीवर डोके ठेवून रडले.हे दृश्य पाहून तेथे उपस्थित असलेल्या सर्वाना अश्रू अनावर झाले.सुमारे तासभर माकड बसून राहिले.काहीवेळाने ते तेथून निघून गेले.
परिसरामध्ये हा चर्चेचा विषय बनला आहे.भाकरीतून निर्माण झालेल्या मैत्रीचे ऋण पूर्ण करण्यासाठी माकड आल्याचे बोलले जात आहे.बिजुआ भागातील गोंधिया येथील रहिवासी चंदनलाल वर्मा यांचा मंगळवारी मृत्यू झाला.कुटुंबीय व नातेवाईकांच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले होते.त्याचवेळी कुठूनतरी एक माकड आले आणि मयत चंदनलाल यांच्या अंगावर पडलेली चादर काढून त्यांचा चेहरा पाहू लागले.हे पाहून ग्रामस्थ आश्चर्यचकित झाले. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार,माकड आपल्या कुटुंबीयांच्या जवळ बसून रडायला लागले.त्यांनी रडणाऱ्या महिलांवर तोंडावर हात ठेवून त्यांचे सांत्वन केले.
शेजारी आणि गावकरीही माकडाला पाहू लागले.गावकऱ्यांच्या उपस्थितीचा माकडावर काहीही परिणाम झाला नाही.ते मृतदेहाजवळच बसून राहिले.कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी चंदनलाल यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला तेव्हा माकडही कुठेतरी निघून गेले काही वर्षांपूर्वी चंदनलाल शेतात पीक वाचवण्यासाठी जायचे तेव्हा माकडांना खायला घालायचे,असे कुटुंबीय सांगतात.त्या भाकरीतूनच माकड आणि चंदनलाल यांची मैत्री झाली.मैत्री आणि भाकरीचे कर्तव्य पार पाडण्यासाठी माकड आले होते.आपली काळजी घेणाऱ्या व्यक्तीच्या निधनामुळे माकडाला दु:ख झाले.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार,मृत चंदनलाल वर्मा हे जनावरांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी जंगलाच्या काठावर झोपडी बांधून दिवसभर शेतात राहायचे.घरातून आणलेल्या जेवणाच्या शिदोरीतील ते एक एक भाकरी माकडाला देत असत.जेवताना माकड त्यांच्याकडे यायचे.मुलगा सोनूने सांगितले की, सुमारे एक वर्षापूर्वी वडील चंदनलाल यांना अर्धांगवायूचा झटका आला होता.
त्यामुळे त्यांना चालता येत नव्हते.चंदनलाल वर्षभरापासून शेतात गेले नव्हते.माकडाला त्याचा मृत्यू कसा कळला माहीत नाही.खरे तर प्राणी हे माणसांपेक्षा जास्त संवेदनशील आणि हुशार असतात हे घटनेवरून दिसून आले.
साभार : अमर उजाला












































































